‘श्रीगोंदा एमआयडीसी व साकळाईची घोषणा म्हणजे चुनावी जुमला !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेच्या निवडणुका समोर आल्यानंतर साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण व एमआयडीसीला तत्वता मंजुरी अशा घोषणा म्हणजे फक्त चुनावी जुमला असून, ही केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे.

असा घणाघाती आरोप विखे पाटील पिता पुत्रावर घन:शाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल २०१९ ला पार पडली डॉ. सुजय विखे हे खासदार झाले.

त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. विखे यांना खासदार करा साकळाई योजनेचे पाणी श्रीगोंदा व नगर तालुक्याला देण्याची घोषणा केली होती.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेल्या कुठल्याही आश्वासनाच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा केलाच नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यापूर्वी त्यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाची घोषणा केली.

तसेच श्रीगोंदा एमआयडीसीला तत्वता मंजुरी अशा प्रकारची फसवी घोषणा केली आहे. ही त्यांची लोकसभा निवडणुकीसाठीची केविलवाणी धडपड आहे. असा घणाघात घनश्याम शेलार यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe