Ahmednagar News : राजकारणात सध्या काही नाटकी पुढारी नको ते अर्विभाव करतात. समाजाची दिशाभूल करून साघेपणाचा आव आणतात.
राहायला पत्र्याचे घर दाखवतात मात्र, आलिशान फॉर्व्युनर वाहनात फिरतात, अशी जहरी टिका खा. सुजय विखे यांनी पारनेरचे आ. निलेश लंके यांच्यावर नाव न घेता केली.
आ. ल॑के यांच्या साधेपणाचा खा. सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत चांगलाच समाचार घेतला. भारतीय जनता पक्षाचे ‘गाव चलो अभियान सध्या सुरु आहे. भाजपच्या अभियानांतर्गत खा, विखे यांनी वाळकी (ता.नगर) येथीलशेतकरी, तरुण वर्ग, महिला बचत गट,
सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर भाजप पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांशी रविवारी (दि.११) सुसंवाद साधला. धार्मिक स्थळांनीही त्यांनी भेटी दिल्या. या दरम्यान, खा. विखेंनी आ. लंके यांच्यावर त्यांचे नाव न घेता अनेक मुद्यांवर निशाणा साधला.
रविवारी सकाळी १०.३० वा. खा, विखे यांचे वाळकी येथे आगमन झाले. खा. विखे यांनी वाळकीच्या एन. डी. कासार कॉलेज ऑफ फार्मसीला सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. भेटीदरम्यान, खा.विखे यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
शाळेच्या मुलीप्रमाणे मुलांनाही एसटी बसमध्ये मोफत प्रवास द्या, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकर्यांना कर्जमाफी द्या, उज्वल्म गॅस योजना बंद का केली?
असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न विद्याथ्यांनी खा. विखेंसमोर उपस्थित केले. विद्यार्थ्याच्या विविध प्रश्नांवर खा.विखेंनी समाधानकारक उत्तरे देत त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
देश तसेच राज्यस्तरावरील विकासाचा उहापोह करत खा. विखेंनी राजकारणातील ढोंगी साधेपणाच्या प्रवृत्तीवर चौफेर टिका केली. ते म्हणाले की,
राजकारणातील काही जण साधेपणाचा आव आणतात. मी सर्वसामान्य आहे, मी साधा आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, त्तेच सर्वकाही करतात. वाळूमाफियांचा उद्योग त्यांच्याकडूनच केला जात आहे. अधिकाऱयांना वेठीस तेच धरतात. चुकीची कामे तेच करतात. विकासाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेतली जाते.
राहायला पत्र्याचे घर असल्याचे सांगतात, मात्र फॉर्च्युनर या आलिशान वाहनात फिरतात, हे कसले त्यांचे साघेपण? असा खडा सवाल खा. विखे यांनी आ, लंके यांचे नाव न घेता केला. खा. विखेंच्या वक्तव्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
मी इतरांसारखा साधेपणाचा आव कधीही आणला नाही व आणणारही नाही. होणाऱ्या कामास होच म्हणतो, अन् न होणाऱ्या कामास नाहीच म्हणतो, ही माझी पद्धत आहे.
मात्र, इतरांची पद्धत्त याउलट आहे. ते न होणाऱ्या कामास हो महणून समाजाची दिशाभूल करतात, असे सांगून ते म्हणाले की, मला पणजोबा, आजोबा, वडिलांच्या विकासाचा वारसा आहे.
विखे घराण्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले जाते. म्हणूनच तर विखे कुटूंबियांवर समाजाने भरभरुन प्रेम केले व करत आहे. मतदारांनीही आता जागरुक राहून योग्य त्याच उमेदवाराला प्राधान्य द्यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशाची प्रतिमा जगात उंचावली. मोदी यांच्यामुळेच देशाची प्रतिमा जगात उंचावली. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानूनच केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत.
जिल्ह्यतील विकास कामांचाही आढावा त्यांनी सविस्तरपणे मांडला. ल्ग्नसोहळे, अंत्यविधी, दशक्रियाविधी हे कार्यक्रम आपण जाणूनबुजून टाळतो.
विकासाच्या कामासाठी आवर्जूनपणे गावोगावी फिरतो, असा प्रबळ दावाही त्यांनी केला.संस्थेचे अध्यक्ष एन.डी. कासार यांनी खा. विखे यांचे स्वागत केले.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे सचिव विक्रम कासार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ,
जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन दादाभाऊ चितळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय गिरवले, सरपंच शरद बोठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वाळकीत मुक्काम ठोकणारे सुजय विखे पहिळे खासदार
तालुक्याच्या राजकारणात वाळकी हे गाव महत्वाचे केंद्रबिंदू आहे. याच वाळकी गावात अनेक रत्न (कर्तबगार व्यक्ती) विविध क्षेत्रात कार्यरत होते व आहेत. खा. विखेंनी भाजपच्या “गाव चलो अभियाना ‘तर्गत वाळकीत रविवारी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. विशेष म्हणजे त्यांनी वाळकीत मुक्कामही ठोकला.
वाळकीत मुक्काम ठोकणारे ते पहिले खासदार ठरले आहेत. खा. विखेंच्या वाळकी दौऱ्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य तर पसरलेच, याशिवाय शेतकरी व सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केला. ‘असा खासदार आम्ही पाहिला नाही’ अशी सकारात्मक प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून उमटली. विखेंच्या वाळकी दौऱ्यात ‘फोटोसेशनही जोरात झाले,
साकळाई योजना मार्गी लागल्यास ते राजकिय संन्यास घेणार का?
नगर व श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरणारी बहुचर्चित साकळाई योजना आपण कुठल्याही परिस्थितीत मार्गी लावणारच, असा विश्वास व्यक्त करत खा. विखे यांनी योजनेसंदर्भात वल्गना करणाऱ्या विरोधकांवर टिकेचा भडीमार केला.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास किमान २२ दिवस शिल्लक आहेत. या दिवसात साकळाई योजनेची प्रशासकिय मान्यता घेण्यासाठी शासन दरबारी प्रचंड पाठपुरावा करु. कुठल्याही परिस्थितीत साकळाई योजना पूर्ण करुच. योजना मार्गी लागल्यास ‘ते’ राजकिय संन्यास घेणार का? असे प्रतिआव्हान खा. विखे यांनी आ. लंके यांना नाव न घेता दिले.