Ahmednagar News : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौऱ्याची सुरूवात केली आहे.
उद्धव ठाकरे हे उद्या (दि.१३) व बुधवारी (दि.१४), असे दोन दिवसांच्या नगर उत्तर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे कार्यकर्ते तसेच जनतेशी संवाद साधणार आहेत.
आमदार अपात्र प्रकरण विरोधात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर अन्याय झाल्याचे जनतेला सांगितले होते. यापुढे जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उत्तर नगर जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या संवाद यात्रा दौऱ्यावर येत आहे. उद्या मंगळवारी (दि.१३) ते छत्रपती संभाजीनगर येथे येथील तेथून ते सोनई (ता. नेवासा) येथे नागरिकांशी सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहे.
त्यानंतर राहुरी येथे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ते श्रीरामपूर येथे दुपारी ३ वाजता नागरिकांची संवाद साधणार आहेत. बाभळेश्वर मार्गे, राहाता येथे सायंकाळी ५ वाजता नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
त्यानंतर ते शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. बुधवारी (दि.१४) सकाळी कोपरगाव येथे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तेथून ते संगमनेर येथे जाणार आहे. तेथून ते अकोला येथे नागरिकांशी संवाद साधणार असून दुपारी शिर्डी विमानतळावर येऊन मुंबईकडे प्रयाण करतील.
कोपरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी ते जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेतील सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार तयारी केल्याने शहरात उत्साहाचे वातावरण झाले आहे.