मोठी बातमी ! Tata कंपनीच्या ‘या’ CNG कारवर मिळतोय 75 हजार रुपयांचा डिस्काउंट, पहा…

Tata CNG Car Discount : टाटा ही देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. या कंपनीने बाजारात भारतातील पहिली सीएनजी ऑटोमॅटिक कार लॉन्च केली आहे.

टियागो आणि टिगोर या सीएनजी गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध झाले आहे. यामुळे आता या दोन्ही CNG गाड्या भारतातील पहिल्या ऑटोमॅटिक सीएनजी कार म्हणून ओळखल्या जात आहेत. यामुळे ज्यांना ऑटोमॅटिक सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी या अलीकडेच लॉन्च झालेल्या गाड्या फायदेशीर ठरणार आहेत.

विशेष बाब म्हणजे कंपनीने या दोन्ही सीएनजी गाड्यांवर मोठी डिस्काउंट ऑफर देखील सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाड्यांवर तब्बल 75 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर दिला जात आहे.

कंपनीकडून या चालू महिन्यात अर्थातच फेब्रुवारी महिन्यात या दोन्ही कारवर एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बोनस आणि कॅश डिस्काउंट ऑफर केले जात आहे.

या डिस्काउंट ऑफर अंतर्गत या दोन्ही कारवर 75 हजार रुपयांपर्यंतचा मोठा डिस्काउंट मिळणार आहे. आता आपण कंपनीने सुरू केलेली ही डिस्काउंट ऑफर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tata Tiago आणि Tigor CNG वर किती डिस्काउंट

Tata Tiago आणि Tigor CNG च्या सिंगल-सिलेंडर या वॅरियंटवर 60,000 रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशा तऱ्हेने कंपनीची ही लोकप्रिय कार ग्राहकांना 75 हजार रुपयाच्या डिस्काउंट ऑफरचा लाभ घेऊन स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

त्याचप्रमाणे, कंपनी ट्विन-सिलेंडर प्रकारावर रु. 35,000 ची रोख सूट आणि रु. 15,000 चे एक्सचेंज बोनस ऑफर करत आहे. म्हणजेच या दोन्ही गाड्यांच्या ट्विन सिलेंडर प्रकारावर ग्राहकांना 45 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर प्राप्त करता येणार आहे.

यामुळे या प्रकारातील कार देखील ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध होणार आहे. मात्र ही ऑफर काही मर्यादित काळासाठीच सुरू राहणार आहे. या ऑफरचा लाभ या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 29 फेब्रुवारीपर्यंतच घेता येणार आहे.

कंपनीने अलीकडेच Tiago CNG AMT रु 7.90 लाख आणि Tigor CNG AMT रु 8.85 लाख लाँच केली आहे. दरम्यान या सीएनजी गाड्यांवर कंपनीकडून हजारो रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध करून दिला जात असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe