नाराज माजी मंत्री कुटूंबियांसह आंदोलनात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळालेल्या माजी मंत्री प्रा . राम शिंदे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची पक्षाबद्दलजी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.

मात्र, तरीही आज भाजपने पुकारलेल्या ‘ महाराष्ट्र बचाव ‘ आंदोलनात शिंदे हे कुटुंबियांसह सहभागी झाले होते. त्यामुळे शिंदे यांची भाजपवर असलेली नाराजी दूर झाली का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या अंदोलनात शिंदे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती आशा शिंदे, चिरंजीव अजिंक्त शिंदे यांचाही सहभाग होता.

हे अंदोलन चौंडीतील माजीमंत्री शिंदे यांच्या निवासस्थासमोर झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सरकार निष्क्रीय ठरले म्हणून महाराष्ट्र बचाओ, शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगारांना पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे

आणि महाराष्ट्र वाचवा अशा आशयाचे फलक दाखवून कपाळाला निषेध नोंदविणाऱ्या पट्ट्या बांधून सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध करण्यात आला.शिंदे कुटुबियांनी या आंदोलनात सहभाग नोंदविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment