अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- महाराष्ट्रात शिस्तबद्ध अशी नोंद असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपीठ दत्त मंदिर संस्थानच्या वतीने काढण्यात येणारा श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांचा पायी दिंडी पालखी सोहळा यावर्षी स्थगित करण्यात आला असल्याची माहिती श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी म्हटले आहे की नेवासा तालुक्यातील श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांचा पायी दिंडी पालखी सोहळा हा देवगडहुन पंढरपूर पर्यंत दरवर्षी मोठ्या थाटामाटात जात असतो
यावर्षी मात्र कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने शासन प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी सन उत्सव,मेळावे तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले
या कारणाने यावर्षी श्रीक्षेत्र देवगड संस्थान ते पंढरपूर हा पालखी सोहळा स्थगित केला आहे असे गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.
दरवर्षी मोठ्या थाटामाटात पांढराशुभ्र वेष परिधान केलेले वारकरी, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंध , टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करत असते,
परंतु यावर्षी राज्यभर कुठल्याही दिंड्या या पंढरी नगरी कडे जाताना दिसत नाही, वारकऱ्यांच्या तथा भाविकांच्या मनात असलेली हुरहूर ही निश्चितच त्यांची विठ्ठलाप्रती असलेली भक्ती यामुळे दर्शवल्या जाते.
प्रशासनाने परवानगी दिली तर गाडीने पंढरपूर येथील श्रीक्षेत्र देवगड संस्थान च्या मठामध्ये श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पादुका घेऊन जात पूजा विधी केली जाईल परंतु हा निर्णय एकंदरीत व कोरोना चा प्रादुर्भाव आषाढी एकादशीच्या वेळेस किती राहील व प्रशासन काय सूचना करेल यावर अवलंबून राहील असे ही गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे
सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुका अल्प सहकाऱ्या बरोबर पंढरपूरला आषाढी एकादशीला पंढरपूरला खाजगी वाहनाने नेण्यात येईल व चंद्रभागा नदीत पादुका स्नान करण्यात येऊन सोहळा विसर्जित करून व क्षेत्र प्रदक्षिणा करून
शासनाचे आदेश असेल तर देवगडच्या भक्त निवासात पालखी तीन चार दिवस थांबण्यात येईल किंवा त्याच दिवशी पादुका पालखी देवगडला येईल असे ही गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com