अहमदनगर :- किरकोळ कारणातून महिनाभरापूर्वी बसस्थानकासमोर मारहाण करण्यात आलेला तरुण प्रेम जगताप (वय २५, रा. स्टेशन रोड) याचा उपचारादरम्यान मंगळवारी (४ जून) मृत्यू झाला.
प्रेमच्या नातेवाईकांनीही याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करावी ,

तसेच आरोपीना अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला नाही, असा आरोप नातेवाइकांनी पोलिसांवर केला आहे.
या हल्ल्यात जखमी झाल्यामुळे प्रेमला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार चालू असताना तो कोमात गेला होता.
त्याला काल सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यानंतर प्रेमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेला 1 महिना उलटूनही एकाही आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी जबाबदार अधिकाऱयांवर कारवाईची मागणी केली आहे.
- अहिल्यानगरमध्ये थार गाडीतून बनावट नोटा घेऊन व्यवहार करायला निघालेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले
- अहिल्यानगरमध्ये कारमधून गुटखा वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी पकडले, तीन लाख ९९ हजाराचा मुद्देमाल केला जप्त
- भारतात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते?, टॉप 5 भाषांची यादी वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
- जगातील फक्त 3 देशांकडेच आहे ‘हे’ विध्वंसक शस्त्र, नावानेच शत्रूला भरते धडकी!
- शनिशिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्ताने गळफास घेत केली आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
.