ESIS Pune Bharti 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून, अर्ज मागवले जात असून इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायची आहेत.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 असून, पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 27 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजार राहायचे आहे.
वरील पदासाठी उमेदवार M.B.B.S असला पाहिजे, तरच तो अर्ज करण्यास पात्र असेल, ऑनलाईन अर्ज [email protected] ई-मेलवर सादर करायची असून, मुलाखतीसाठी प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे-411037. या पत्त्यावर 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत हजर राहायचे आहे.
वरील पदांसाठी वयोमर्यादा ६९ वर्षे असून, या पुढील उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.esic.gov.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज वर दिलेल्या ईमेद्वारेच सादर करायचे आहेत.
-तसेच अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज सादर करण्याची तारीख 26 फेब्रुवारी 2024 असून, देय तारखे अगोदरच आपले अर्ज सादर करावेत. या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास जाहिरात सविस्तर वाचा.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
-मुलाखतीची तारीख 27 फेब्रुवारी 2024 अशी आहे.