चिमुरडे अत्याचाराला बळी पडतायेत? घरात महिलासंह मुलांना मारहाण होते? ‘या’ नम्बरवर संपर्क करा, चाइल्ड हेल्पलाईन तत्परतेने पोहोचवते मदत

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : समाजात विविध प्रकारच्या अनेक घटना घडत असतात. अनेकदा महिलांना, मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्रास होतो.

अशा लोकांसाठी पोलीस प्रशासन तत्पर असते. यांना विविध प्रकारे मदत पुरवली जाते. समाजात जर कुणी गुन्हेगारी वृत्तीला बळी पडत असेल तर त्यांच्यासाठी मदतीसाठी पोलिसांनी काही हेल्पलाईन नम्बर देखील सुरु ठेवलेले आहेत.

डायल ११२

समाजात सुरु असणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी व सर्व प्रकारच्या तक्रारी करता याव्यात यासाठी पोलिसांनी ११२ हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे.

रोज अनेक कॉल या क्रमांकावर येतात. बाबा आईला आणि मलाही मारहाण करतात, अशा प्रकारच्या तक्रारीही मुलांकडून नियंत्रण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनकडे आलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे महिलांचाही अनेक तक्रारी या नम्बरवर येत असतात. या डायल ११२ वर आलेल्या बहुतांशी तक्रारींचे निवारण करण्यात व प्रसंगी मदत पोहोचवण्यात आलेल्या आहेत.

लहान मुलांच्या बाबतीत काही गुन्हे असतील तर १०९८ हा चाइल्ड लाइन हेल्पलाइन नम्बर –

लहान मुलांच्या बाबतीत काही गुन्हे, तक्रारी असतील त्यासाठी १०९८ हा चाइल्ड लाइन हेल्पलाइन नम्बर देण्यात आलेला आहे.

लहान मुलांवरील अत्याचार, अपहरण, बालमजुरी किंवा कौटुंबिक हिंसाचार अशा कोणत्याही तक्रारीबाबत पोलिसांच्या १०९८ या चाइल्ड लाइन हेल्पलाइन या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजवर अनेक तक्रारी १०९८ या नंबरवर आलेल्या असून त्यांना मदत देखील पोहोचवण्यात आलेली आहे. चाइल्ड लाइनवर अद्याप घरात वडील नेहमीच दारू पिऊन येतात.

शिवीगाळ करतात. ते आईला आणि मलाही मारहाण करतात, अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात येत आहे, अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असल्याबाबत माहिती या नंबरवर आजवर मिळालेली आहे.

अहमदनगर चाइल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक म्हणतात, अल्पवयीन मुले किंवा मुली यांच्यासंबंधी कोणत्याही तक्रारी असतील त्या नियंत्रण कक्षासह चाइल्ड लाइनकडे येतात.

त्यांचे योग्य ते निराकरण केले जाते. तसेच तातडीने त्यावर कार्यवाही केली जाते. यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe