Agniveer Recruitment 2024: लष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी! अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू, वाचा अर्ज कुठे आणि कसा कराल?

Ajay Patil
Published:
agniveer recruitment

Agniveer Recruitment 2024:- जर आपण प्रामुख्याने ग्रामीण भागातील तरुणांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर लष्करात भरती होण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लष्करी भरतीची तयारी हे तरुण करत असतात.

अशाप्रकारे लष्करी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून लवकरच अग्निपथ योजनेच्या माध्यमातून आता भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

अग्निपथ भरती प्रक्रिया हे सरकारची योजना असून या अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना चार वर्षाकरिता लष्करामध्ये सेवा देता येते

व त्यानंतर जवळपास 75% अग्निविरांना सैन्यातून मुक्त केले जाते. परंतु यातील 25% अग्नीविर हे एसआरपीएफ आणि इतर निमलष्करी दलांमध्ये पुढील कामासाठी नियुक्त केले जातात.

 अग्निविर भरतीसाठी नोंदणी सुरू

 अग्नि विर भरती प्रक्रिया 2024 साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन  अर्ज दाखल करावा लागणार आहे. याची प्रक्रिया साधारणपणे 8 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 21 मार्च 2024 पर्यंत आहे.

या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील ते 8 फेब्रुवारीपासून www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

 भरती प्रक्रिया अंतर्गत भरली जाणारी पदे आणि लागणारी पात्रता

1- अग्निवीर जनरल ड्युटी अर्थात जीडी- या पदाकरिता उमेदवार 45% गुणांचं दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व प्रत्येक विषयात किमान 33 गुण असणे आवश्यक आहे. समजा जर दहावी या इयत्तेत सी ग्रेड आणि ग्रेडिंग सिस्टम असेल

तर प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी डी ग्रेड असणे आवश्यक आहे. या अंतर्गत ड्रायव्हर पदासाठी लाईट मोटर व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जीडी पदासाठी उंची 168 सेंटीमीटर असावी.

2- अग्निवीर टेक्निकल- टेक्निकल पदाकरिता बारावी भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी सह 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व प्रत्येक विषयांमध्ये 40% गुन असावेत किंवा एनआयओएस आणि संबंधितासह कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांचे बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

एनएसक्यूएफ स्तर चार किंवा त्याहून अधिक क्षेत्रात किमान एक वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. तसेच 50% गुणांसह दहावी मध्ये  इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषय 40% गुणांसह उत्तीर्ण आणि

मान्यता प्राप्त आयटीआय मधून दोन वर्षाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि पॉलिटेक्निक मधून दोन किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा आवश्यक आहे. टेक्निकल पदासाठी 167 सेंटीमीटर उंची असावी.

3- अग्निवीर लिपिक- इंटरमिजिएट परीक्षा कोणत्या विषयासाठी 60 टक्के गुणांसह(कला,वाणिज्य आणि विज्ञान) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे

तसेच प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण आणि इंग्रजी आणि गणित/ अकाउंट/ बुक कीपिंग अतिरिक्त 50 टक्के गुण. 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व उंची 162 सेंटीमीटर असावी.

4- ट्रेडमन या पदाकरिता प्रत्येक विषयात 33% गुणांचा दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व उंची 168 सेंटीमीटर असावी.

 सर्व पदांसाठी आवश्यक असलेले निकष

 या पदांसाठी वयोमर्यादा 31-10-2024 रोजी साडे सतरा ते 21 वर्षे दरम्यान असावे व वजन 50 किलो असणे गरजेचे आहे. छाती 77cm न फुगवता आणि आणि फुगवून 82 cm म्हणजेच पाच सेंटीमीटर फुगवता यायला हवी.

 शारीरिक चाचणी

 यामध्ये 1.06 किलोमीटर तुम्हाला पाच मिनिट 30 सेकंद ते पाच मिनिट 45 सेकंदात धावावे लागणार आहे. तसेच इतर देखील शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे गरजेचे राहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe