NHM Nashik Bharti 2024 : नाशिकमध्ये ‘स्टाफ नर्स’ पदांसाठी भरती सुरु, पगार 18 हजारापर्यंत…

Ahmednagarlive24 office
Published:
NHM Nashik Bharti 2024

NHM Nashik Bharti 2024 : मोबाईल मेडिकल युनिट उपक्रमा नाशिक अंतर्गतसध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदरांकडून अर्ज मागवले जात आहेत, जरी या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज कसे आणि कुठे सादर करायचे आहेत, पाहुयात…

मोबाईल मेडिकल युनिट उपक्रमा नाशिक अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, ANM/स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज पाठवावेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार असेल.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी – MBBS

ANM/स्टाफ नर्स पदासाठी – ANM/ GNM/ B.Sc. Nursing

लॅब टेक्निशियन – 12th + Diploma

फार्मासिस्ट – 12th + Diploma

या पदांसाठी अर्ज कै.) रावसाहेब थोरात सभागृह (नवीन), जिल्हा परिषद, नाशिक या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तर अर्ज 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. भरती संबंधित पूर्ण माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://zpnashik.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जामध्ये माहिती पूर्ण भरलेली असावी लक्षात घ्या अपूर्ण अर्ज असल्यास अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जासोबत कागदपत्राची प्रत जोडवी आणि मगच आपले अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावेत.

-अर्ज 16 फेब्रुवारी 2024 रोजी सादर करायचा आहे नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe