Ahmednagar News : शिवसेनेच्या पवित्र भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला. भगव्यामध्ये छेद देण्याचा प्रयत्न केला. अशांना कोणत्याही परिस्थितीत गाडलेच पाहिजे. एकवेळ चुकीला माफी असते, पण गुन्ह्याला माफी नसते,
दिल्लीच्या सीमेवर जणू युद्ध सुरू आहे, असे दिसत आहे. शेतकरी येऊच नये, यासाठी केंद्र सरकार अन्नदात्याविरोधात पोलिसांना, जवानांना बंदूक घेऊन उभे केले जात आहे. ही कुठली लोकशाही? असा संतप्त सवाल ठाकरे त्यांनी उपस्थित केला.
पक्षप्रमुख ठाकरे यांचा सद्या अहमदनगर जनसंवाद दौरा सुरू आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पक्षप्रमुख ठाकरेंनी काल बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांचे जनतेने जंगी स्वागत केले.
याप्रसंगी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी म्हणतात, आम्हाला घराणेशाही नको, मग ना. अशोकराव हे शंकरराव चव्हाण यांचे पुत्रच आहे, ही घराणेशाही नाही का. मुख्यमंत्री आणि त्यांचा खासदार पुत्र ही घराणेशाही नाही. ना. अजित पवार सुद्धा घराणेशाहीचे नेतृत्व आहे, अशी टीका घराणेशाहीवरुन उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर केली.
काँग्रेसमधून आलेली, शिवसेनेमधून आलेली घराणेशाही चालते. तुम्हाला संघ मुक्त भारत म्हणणारे नितीशकुमार पाहिजे. पण बाळासाहेबांची घराणेशाही तुम्हाला नको आहे. हिंदुत्ववादी शिवसेना तुम्हाला नको आहे. यावेळी ठाकरे यांनी भाजपच्या घराणेशाहीवर घणाघात केला.
ते पुढे म्हणाले, याप्रसंगी खासदार संजय राऊत म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशामध्ये बदल घडवताना दिसत आहे. आज कोपरगावचे चित्र पाहिल्यानंतर आम्हाला खात्री पटली आहे. हा संपूर्ण नगर जिल्हा ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहील आणि भगवा झेंडा फडकेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, प्रवीण शिंदे, निलेश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केली. माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वरूण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे,
उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, श्रीरंग चांदगुडे, बाळासाहेब राहाणे, सपना मोरे, सुनिल तिवारी, निलेश धुमाळ, मनोज कपोते, सनी वाघ, किरण बिडवे व राखी विसपुते, माजी नगरसेवक वर्षा शिंगाडे, भरत मोरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अॅड. संदिप वर्षे, काँग्रेसचे आकाश नागरे, डॉ. म्हसे, डॉ. अजय गर्जे,
माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, कालुअप्पा आव्हाड, संजय सातभाई, ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, योगेश बागुल, असलम शेख, कलविंदरसिंग दडियाल, रवि कथले, सिद्धार्थ शेळके, शेखर कोलते, गगन हाडा आदी हजर होते. शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठोंबरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.