Ahmednagar Breaking : नगरसेवक युवराज पठारे हल्ला प्रकरणी तिघे ताब्यात, महत्वाची माहिती समोर…

Ahmednagarlive24
Published:

पारनेर नगरपंचायतीचे महायुतीचे नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना ताब्यात घेण्यास पारनेर पोलिसांना यश आले आहे.

जुन्या वादातून नगरसेवक पठारे यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पठारे यांच्या फिर्यादीवरून गणेश चंद्रकांत कावरे, संग्राम चंद्रकांत कावरे (दोघेही रा.वरखेड मळा, ता.पारनेर), एक अल्पवयीन, महेश राजू खेडेकर (रा.पारनेर), ओमकार गणेश मुळे (रा.देवीभोयरे, ता.पारनेर) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे

या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी देवेन भारती व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिग्विजय समोरील घटनास्थळी भेट दिली. गुरूवारी (दि १५) सकाळी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने नगरसेवक पठारे यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. स्ट्रीगर दाबल्यानंतर गोळी कट्टयातच आडकल्याने मोठा अनर्थ टळला. गोळीबार फसल्यानंतर त्या आरोपीने खिशातील चॉपर काढून पठारे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पठारे यांच्यासमवेत असलेल्या सहकार्‍यांनी चॉपरने वार करण्याचा प्रयत्नही हाणून पाडला.

हल्ल्यासाठी आरोपी पठारेंच्या पाळतीवर..
युवराज पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीन आरोपी व त्याचे सहकारी गेल्या काही दिवसांपासून पठारे यांच्या पाळतीवर असल्याचे पुढे आले आहे. बुधवारी सकाळीही तो त्याच्या साथीदारांसह यशवंत हॉटेलमध्ये येऊन गेला होता. युवराज पठारे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समजल्यानंतर तालुक्यातून त्यांचे मित्र पारनेरमध्ये दाखल झाले. दिवसभर पारनेर पोलीस ठाणे आवारात पठारे समर्थकांनी गर्दी केली होती.

गावठी कट्टाचे परप्रांतीय कनेशन..
युवराज पठारे यांच्यावर हल्ल्यासाठी आरोपीने सुपा-म्हसणे फाटा औद्योगिक वसाहतीतील एका बिहारी व्यक्तीकडून घेतला कट्टा विकत घेतल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या औद्योगिक वसाहतीत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम करण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय आले आहेत. काम करणार्‍या बिहारी व्यक्तीकडून गावठी कटटा घेतल्याचे अल्पवयीन आरोपी सांगत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe