Ahmednagar News : तुम्हाला कोठे प्रवासासाठी बाहेर जायचे असेल तर त्या आधी ही महत्वाची बातमी वाचा. म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही.
अहमदनगरमधून काही बसेस तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळाने मराठवाड्यातील बीड, गेवराईकडे जाणाऱ्या बस तात्पुरत्या बंद केल्या आहेत. नगर विभागाच्या बसचा यात समावेश आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी महामार्ग बंद करण्यात आले होते.
दरम्यान हे आंदोलन पेटण्याची शक्यता गृहीत धरून एसटी महामंडळाने हा निर्णय घेत मराठवाड्यातील बीड, गेवराईकडे जाणाऱ्या बस तात्पुरत्या बंद केल्या आहेत. नगर विभागाच्या बसचा यात समावेश आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेतील मसुद्यामध्ये सगेसोयऱ्यांच्या व्याख्येसह कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाचा आज अथवा दिवस असून त्यांची सहाव्या दिवशी जरांगे यांची तब्येत खालावल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.
दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून १४ फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती व त्यामुळे अनेक ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले.
दरम्यान, गुरुवारी रात्री काही ठिकाणी महामार्ग अडवून टायर पेटवण्यात आले. त्यामुळे खबरदारी म्हणून एसटीच्या नगर विभागाने संबंधित वरील बसेस तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.