Agri Machinery: स्वस्त मिळणारे ‘हे’ मशीन 1 एकर गव्हाची कापणी करेल 1 तासात! वाचा या मशीनची किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
reaper binder machine

Agri Machinery:- सध्या आपण जर संपूर्ण भारताचा विचार केला तर रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू झाल्याची सध्या स्थिती आहे. तसेच रब्बी हंगामातील संपूर्ण देशातील गहू हे प्रमुख पीक असते व काही दिवसात साधारणपणे गव्हाची काढणी देखील सुरू होण्याची स्थिती आहे.

गव्हाच्या कापणीचा विचार केला तर यासाठी वेळ आणि खर्च तसेच कष्ट देखील भरपूर लागतात. या संपूर्ण कामासाठी शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च होत असतो. परंतु आता अशा कामांकरिता अनेक प्रकारची कृषी यंत्रे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा खर्च तसेच वेळ व कष्ट देखील वाचतात.

या दृष्टिकोनातून जर आपण गहू या पिकाच्या कापणीसाठी उपलब्ध असलेल्या यंत्रांचा विचार केला तर त्यांच्या किमती या जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला खरेदी करणे परवडत नाही.

परंतु यामध्ये असे काही परवडण्यासारखी यंत्र आहेत की त्यांच्या साह्याने शेतकरी गहू काढण्याचे काम अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. यातीलच एक यंत्र म्हणजे स्वस्तात मिळणारे यंत्र होय. या लेखामध्ये आपण या यंत्राविषयीची माहिती घेणार आहोत.

 गहू काढण्यासाठी उपयुक्त आहे रिपर बाईंडर मशीन

 रिपर बाईंडर यंत्र हे एक स्वस्त कृषी यंत्र असून विविध पिकांच्या कापणी करिता शेतकरी याचा वापर करू शकतात. हे यंत्र 10.5 एचपी पावरसह डिझेल इंजिनसह येते. या यंत्रामध्ये 1.2 मीटर रुंद कटर असते व याच्या साह्याने हे यंत्र पिकांचे कापणी अगदी सहजतेने करू शकते

आणि त्यांचे बंडल देखील बांधू शकते. रिपर बाईंडर मशीनच्या सहाय्याने गहूच नाहीतर भात तसेच बार्ली यासारखे पिकांची कापणी आणि पेंड्या बांधता येतात.

या यंत्राच्या मदतीने शेतकरी शेतात सुमारे पाच ते सात सेंटीमीटर पर्यंत वाढलेले पिकांची कापणी करू शकतात. विशेष म्हणजे हे मशीन चालवताना शेतकऱ्यांना यावर बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

 काय आहेत या मशीनचे फायदे?

1- या यंत्राच्या वापराने वेळ आणि श्रम वाचतात.

2- रिपर बाईंडर चा वापर करून गहू, भात तसेच बार्ली आणि इतर अनेक पिके कापण्याकरिता वापर करता येऊ शकतो.

3- एका एकर मधील गहू एका तासात कापता येणे शक्य आहे.

4- या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे हे निव्वळ पिकांची कापणी करत नाही तर त्यांचे पेंड्या देखील बांधण्याचे महत्त्वपूर्ण काम करते.

5- येतात उगवलेली झुडपे देखील सहजपणे या मशीनच्या सहाय्याने कापता येतात.

6- त्याच्या साह्याने तुम्ही पाच क्विंटल पर्यंतचे वजन देखील उचलू शकता.

7-  रिपर बाईंडर मशीन पिकांचे कापणी आणि पेंढ्या बांधते तेव्हा पेंड्यांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.

8- विशेष म्हणजे हे यंत्र तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहजतेने नेऊ शकता.

 किती आहे रिपर बाईंडर मशीनची किंमत?

 भारतामध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून रिपर बाईंडर मशीनची निर्मिती केली जाते आणि सर्वांच्या किमतींमध्ये फरक आहे. साधारणपणे भारतात या मशीनची किंमत सुमारे 80 हजारापासून ते चार लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe