Budh Gochar 2024 : बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, तर्क, हुशारी आणि मैत्रीचा कारक मानला जातो. नऊ ग्रहांमध्ये बुधला विशेष स्थान आहे. अशातच बुध 26 मार्च रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. बुध आणि मंगळ हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. अशातच मेष राशीमध्ये बुधने प्रवेश केल्याने सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडेल. काही राशींना या संक्रमणाचा खूप फायदा होईल. कोणत्या राशींना फायदा होईल पाहूया…
मिथुन
मेष राशीत बुधाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना यश मिळवून देईल. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात नफा होईल आणि बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.
मेष
मेष राशीच्या लोकांना या संक्रमणाचा खूप फायदा होणार आहे. या काळात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि शत्रूंवर विजय मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही सर्व कामात यशस्वी व्हाल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांचा समाजात सन्मान वाढेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. तुम्ही अडचणींचा सामना करू शकाल. सर्व नकारात्मक गोष्टींवर मात करून पुढे जाल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांनाही या संक्रमणाचा फायदा होणार आहे. पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. कोर्टाच्या कामात यश मिळेल.
धनु
धनु राशीच्या लोकांवर बुध सुद्धा दयाळू राहील. यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ वरदानापेक्षा कमी नाही. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. प्रेमी युगुलांसाठी हा काळ शुभ राहील, विवाहाची शक्यता आहे.