Electricity Bill Saving Tips:- सध्या आता उन्हाळा सुरू होण्याचा कालावधी असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये प्रचंड उकाडा जाणवेल अंगाची लाही लाही करणारी उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढेल.
जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा प्रत्येक घरामध्ये विजेवर चालणारे जे काही एअर कंडिशनर, पंखे आणि रेफ्रिजरेटर यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढतो. याशिवाय घरामध्ये टीव्ही तसेच वाशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन इत्यादी सारख्या अनेक विजेवर चालणारी उपकरणे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
तसेच आपण हिवाळ्याचा विचार केला तर हिवाळ्यामध्ये गिझरचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर होतो. आपल्या सोयीसाठी जेव्हा आपण असे उपकरणाचा वापर करतो परंतु तेव्हा या उपकरणाच्या माध्यमातून विजेचा वापर वाढतो व प्रचंड प्रमाणात विजेचे बिल आपल्याला प्रत्येक महिन्याला भरावे लागते
व आपल्या खिशाला भुर्दंड बसतो. परंतु वाढत्या वीज त्यापासून तुम्हाला मुक्तता हवी असेल किंवा तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणारे बिल जर निम्म्यावर आणायचे असेल तर तुम्ही काही छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणे खूप गरजेचे असते.
या गोष्टींवर तर तुम्ही लक्ष दिले तर तुम्ही निश्चितच विज बिल अर्ध्यावर आणू शकतात. म्हणून कुठल्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.
या गोष्टी पाळा आणि वीज बिलात बचत करा
1- घरातील जुन्या उपकरणांचा वापर टाळावा- घरामध्ये आपण जे काही विजेवर चालणारी उपकरणे वापरतो ते बऱ्याचदा कालबाह्य म्हणजे जुनी झालेली असतात. परंतु तरी देखील जर आपण अशा उपकरणांचा वापर केला
तर ते इतर उपकरणांच्या तुलनेमध्ये विजेचा जास्त वापर करतात. त्यामुळे नक्कीच तुमच्या महिन्याच्या वीज बिलामध्ये वाढ होते. यावर उपाय म्हणून तुम्ही जर एनर्जी एफिशियंट असलेले पाच स्टार रेटेड उपकरणे वापरली तर नक्कीच विजेत बचत होते.
2- पाच स्टार रेटेड रेफ्रिजरेटर अपग्रेड- तुम्ही जर रेफ्रिजरेटरचा वापर करत असाल तर त्याला पाच स्टार रेटेड रेफ्रिजरेटर मध्ये अपग्रेड करून तुम्ही तुमचा ऊर्जेचा वापर तब्बल 40 टक्क्यांनी कमी करू शकतात.
याशिवाय तुम्हाला जर एसी खरेदी करायचा असेल आणि तुम्ही जर तो पाच स्टार असलेला खरेदी केला तर 30% पर्यंत वीज बिलात बचत होऊ शकते.
3- उपकरणांचे स्विच ऑफ करण्यावर लक्ष देणे- बऱ्याचदा आपण घरातील दिवे तसेच काही उपकरणांचे स्वीच बंद करायला विसरतो. तसेच घरामध्ये आपण चार्जर आणि लॅपटॉप सारख्या उपकरणांचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर करतो.
अशी उपकरणे जरी छोटी असली तरी यांचा विजेचा वापर मात्र जास्त असतो. अशावेळी जेव्हा तुम्ही हे उपकरणे वापरत असाल तेव्हा ते बंद करून ठेवणे गरजेचे आहे.
4- घरातील बल्ब बदलणे- सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे उत्कृष्ट असे एलईडी लाईट बल्ब मिळतात. हे बल्ब पारंपारिक बल्बपेक्षा खूप कमी प्रमाणात विजेचा वापर करतात.
एवढेच नाही तर कमीत कमी वीज वापरून जास्त प्रकाश देतात व जास्त कालावधी करिता टिकतात. त्यामुळे घरातील जुने बल्ब असतील तर ते बदलून एलईडी बल्ब वापरणे खूप फायद्याचे ठरते.
5- एअर कंडिशनर सेटिंगमध्ये बदल- उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांमध्ये एसीचा वापर केला जातो. त्यामुळे एसीच्या माध्यमातून विजेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो.
अशा परिस्थितीत तुम्हाला विजेमध्ये बचत करायची असेल तर तुम्ही एसी नेहमी 24 अंशावर चालवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे करत असताना तो जेणेकरून वेळोवेळी स्विच ऑफ होत राहील व कमी वीज वापरेल.
6- चार्जर व कम्प्युटर बंद ठेवावा- बऱ्याचदा आपण कम्प्युटरवर काम करतो व पॉवर स्विच बंद करत नाही. काम झाल्यानंतर स्वीच नेहमी बंद करावा तसेच मोबाईल चार्जर काम नसताना देखील आपण त्याचा स्वीच ऑन ठेवतो
व त्यामध्ये देखील काही प्रमाणात विजेचा वापर होत असतो.असे न करता मोबाईल चार्जिंगचे काम संपल्यानंतर चार्जरचा स्विच बंद करणे गरजेचे आहे. तसेच टीव्हीला कधीही स्टॅन्ड बाय मोड मध्ये ठेवू नका.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी छोट्या परंतु अत्यंत महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले तरी तुम्ही विज बिलात बचत करू शकतात.