आता हजारो रुपयांच्या विज बिलातून मिळणार सुटका, अदानी कंपनीचे 1 KW, 2KW आणि 3KW चे सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येणार ? पहा….

Ahmednagarlive24 office
Updated:

Adani Solar Panel Price : तुम्हीही सोलर पॅनल बसवण्याचा तयारीत आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. अलीकडे वीजबिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्वसामान्यांना हजारो रुपयांची वीजबिल भरावे लागत आहे.

घरात एसी, फ्रिज, फॅन, ओव्हन इत्यादी उपकरणांची संख्या वाढली आहे. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे आता विजेचा वापर वाढत आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात अधिक वीज वापरली जाणार आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना विजेचा खर्च हा अवाक्याबाहेर जाईल अशी भीती आहे.

दरम्यान या साऱ्या गोष्टींवर रामबाण उपाय म्हणजे सोलर पॅनल. सोलर पॅनल बसवल्यास विज बिल शून्यावर येऊ शकते. अर्थातच, तुम्हाला मोफत वीज वापरता येणार आहे. यासाठी मात्र तुम्हाला सुरुवातीला सोलर पॅनल बसवावे लागणार आहे.

दरम्यान आता आपण सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो हे थोडक्यात समजून घेणार आहोत. 1 किलोवॅट, 2 किलोवॅट आणि 3 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी साधारणता किती रुपयांचा खर्च करावा लागू शकतो ? याविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च ?

मिळालेल्या माहितीनुसार 3 किलोवॅटचे अदानी कंपनीचे सोलर पॅनल बसवण्यासाठी दीड लाखांपासून ते दोन लाख 85 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागणार आहे. दीड लाख रुपयांमध्ये ऑनग्रीड सोलर पॅनल बसवता येणार आहे तर दोन लाख 85 हजार रुपयांच्या खर्चात ऑफग्रीड सोलर पॅनल बसवता येणार असे.

ऑफग्रीड सोलर पॅनल मध्ये सिस्टीम वीज साठवून ठेवते, ज्यामुळे तुम्हाला पॉवर आउटेज दरम्यान इन्व्हर्टरद्वारे साठवलेली ऊर्जा वापरता येते. यामुळे ऑन ग्रीडपेक्षा ऑफ ग्रिड सोलर पॅनलचा खर्च अधिक असतो. दुसरीकडे ऑनग्रीड मध्ये जेव्हा लाईट येईल तेव्हाच वीज उपलब्ध होते.

अर्थातच लाईट गेलेली असेल तर ऑन ग्रीड सोलरचा काहीच फायदा होणार नाही. यामुळे ऑफग्रीड सोलर हे महाग असते. तीन किलो वॅट सोलर पॅनलच्या क्षमते बाबत बोलायचं झालं तर हे सोलर पॅनल दिवसाला 12 ते 15 युनिट पर्यंत विज उत्पादित करू शकते. म्हणजेच जर तुमच्या घरासाठी दिवसाला 12 ते 15 युनिट वीज लागत असेल तर तुम्ही तीन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवू शकता.

एकंदरीत, तुम्ही किती क्षमतेचे पॅनल्स आणि बॅटरी लावत आहात यावर सोलर पॅनल सेटअपचा खर्च अवलंबून राहणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. तथापि काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये, एक किलोवॅट क्षमतेच्या सेटअपसाठी 50 हजार ते एक लाख रुपये एवढा खर्च येतो.

3 KW साठी दीड लाखांपासून ते दोन लाख 85 हजारापर्यंत तर 5 किलोवॅट क्षमतेच्या सेटअपसाठी 2.25 ते 3.25 लाख रुपये खर्च येतो. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देखील दिले जात आहे. मात्र हे अनुदान फक्त नोंदणीकृत डीलर कडून सोलर पॅनल बसवले तरच दिले जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe