Ahmednagar News : आमदार निलेश लंके यांचं लोकसभेचे लढण्याचे संकेत आजवर होते. परंतु आता ते लोकसभेला लढणार हे फायनल झालं असल्याचे काही जवळच्या व्यक्तींकडून सांगण्यात येत असल्याची चर्चा आहे.
ते शरद पवार गटाकडून लढतील हे सांगण्यात येत होते परंतु आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या सुरु आहे.

आ. लंके आणि जिल्ह्यातील उठाबा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून बैठका सुरू आहेत.
आ. लंके खासदारकी लढणार असल्याने लंके समर्थक, नीलेश लंके प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारसंघात दौरे करत आहेत.
त्यामुळे आ. निलेश लंके लोकसभा तर लढतील पण त्यांचा गनिमी कावा नेमका काय हे कुणाच्या लक्षात मात्र येईना.
त्यात लोकसभा आ. नीलेश लंके का राणी नीलेश लंके या दोघांपैकी कोण निवडणूक लढणार, हे देखील अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु काही झाले तरी लंके हे लोकसभा लढणार हे मात्र नक्की झालं आहे अशी चर्चा आहे.
भाजप- अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची राज्यात सत्ता आहे. नगर जिल्हा दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची युती असल्याने आ. लंके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नाही, तर शरद पवार हे आ.लंके यांना खासदारकीची उमेदवारी देणार का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
त्याचदरम्यान आता आ. निलेश लंके हे शिवसेनेकडून (उभाठा) लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागले आहेत अशी चर्चा मात्र आता कानावर पडायला लागली आहे.
शिवसेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम आ. लंके यांनी केले आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून लंके मुंबईत आणि पारनेरसह जिल्ह्यात परिचित आहेत.
दरम्यान पिता-पुत्र विखे, माजी मंत्री कर्डिले, आ. संग्राम जगताप यांना थोपवण्यासाठी आ. लंके याना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रयत्नशील असल्याचे समजते.
त्यामुळे आता आ. लंके हे उद्धव ठाकरे गट शिवसेनेकडून लोकसभा लढतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हे पण वाचा :
- अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात” विखे पाटील यांचा रोख कुणाकडे ?
- शिर्डी लोकसभेसाठी महायुतीकडून कोण ; गद्दारीचा शिक्का बसलेले सदाशिव लोखंडे यांचा पत्ता कट होणार ?
- नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप लोकसभा लढवणार का ? जगताप म्हणतात, अजित दादा……