मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचे चालणारे सेक्स रॅकेट उघड ! अहमदनगर, नाशिकच्या मुलींकडून देहविक्री

Published on -

Ahmednagar News : समाजातील नैतिकता किती ढासळली आहे हे दाखवणारे अनेक प्रसंग अनेकदा समोर येतात. आता आणखी एक हैवानी कृत्याचा पर्दाफाश करणारी घटना समोर आली आहे.

४२ वर्षीय महिला आपली मुलगी व जावयाच्या मदतीने राजरोस सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर, नाशिकच्या मुलींना घरी आणून हा देहविक्रीचा धंदा सुरू असल्याचे समोर आले आहे.

उच्चभ्रू वसाहतीत भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन असेल प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. माधुरी सुरेश थोरात (४२, रा. विटखेडा) असे या आरोपी महिलेचे नाव आहे.

जावई शरद संजय साबळे (२९) व रोहिणी शरद साबळे (२१) हे आणखी दोघे आरोपी आहेत. त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

उपायुक्तांच्या पथकाने रविवारी रात्री डमी ग्राहक पाठवून दोन घरांमध्ये छापा टाकत ही कारवाई केली. त्यांच्या तावडीतून ५ पीडितांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती समजताच त्यांनी रविवारी रात्री सापळा रचत डमी ग्राहक पाठवला. त्यात व शरदमध्ये पैशांचा व्यवहार ठरल्यानंतर देहविक्रीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी साताऱ्यातील गोपालनगरमध्ये सी. आर. रेसिडेन्सीच्या फ्लॅट क्रमांक ३ मध्ये छापा टाकत मोठी कारवाई केली.

या कारवाई दम्यान शरदसह त्याची पत्नी रोहिणी देखील उपस्थित होती. तेथील एका पीडितेच्या चौकशी केल्यानंतर शरदची सासू माधुरीच्या घरी आणखी मुली असल्याचे पोलिसांना समजले.

त्यानंतर पोलिसांनी माधुरीचे घर गाठत तेथेही कारवाई केली. तेथे चार पीडिता पोलिसाना आढळून आल्या.

माधुरीने आपल्या काळ्या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केली असून पीडितांची सुधारगृहात रवानगी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News