IRCTC Tour Package:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना भारतातील आणि भारताबाहेरील पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा आणि मनसोक्त पर्यटनाचा आनंद लुटण्याची इच्छा असते. त्यामुळे असे पर्यटक नेहमी कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लानिंग करत असतात.
परंतु त्या अगोदर आपल्याला आपल्या खिशाचा बजेट पाहणे खूप गरजेचे असते. कारण आपल्याला परवडेल अशा ठिकाणीच कोणीही जाणे पसंत करते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण आयआरसीटीसीचा विचार केला तर या माध्यमातून अनेक आकर्षक टूर पॅकेज लॉन्च केले जातात.
यामध्ये भारतातच नव्हे तर विदेशातील पॅकेजचा देखील समावेश असतो. अगदी याच पद्धतीने आयआरसीटीसीच्या माध्यमातून कुटुंबासह स्वस्तात फिरता येईल या पद्धतीचे एक पॅकेज लॉन्च करण्यात आलेले आहे.
नेमके हे पॅकेज भारतातील कुठल्या ठिकाणी फिरण्यासाठी फायद्याचे राहील व किती तिकीट लागेल यासंबंधीची महत्वाची माहिती या लेखात आपण बघणार आहोत.
आयआरसीटीसीने लॉन्च केले हे स्वस्त पॅकेज
1- माता वैष्णोदेवी टूर पॅकेज- या अंतर्गत माता वैष्णोदेवी दर्शनासाठीचे एक आकर्षक टूर पॅकेज लॉन्च करण्यात आलेले असून याची लॉन्चिंग 22 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून होणार आहे.
हे पॅकेज एक रात्र आणि दोन दिवसांचे असून बुधवार किंवा रविवारी तुम्ही सकाळी सहा वाजता याकरिता ट्रेन पकडू शकतात. विशेष म्हणजे या पॅकेजेच्या माध्यमातून वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करता येणार आहे.
किती आहे तिकीट दर?
यामध्ये जर एकट्याला प्रवास करायचा असेल तर नऊ हजार 145 रुपये भरणे गरजेचे आहे. दोन व्यक्ती प्रवास करणार असाल तर प्रतिव्यक्ती सात हजार सहाशे साठ रुपये इतका दर आहे. प्रवासासाठी तीन लोक असतील तर प्रतिव्यक्ती सात हजार नऊशे वीस रुपये भरावे लागतील.
एवढेच नाही तर जर तुमच्यासोबत पाच ते अकरा वर्षाचा मुलगा असेल आणि तुम्हाला गादी हवी असेल तर त्याकरिता स्वतंत्रपणे तुम्हाला 6055 भरणे गरजेचे आहे व बेड नको असेल तर पाच हजार पाचशे साठ रुपये लागतील.
2- दक्षिण भारत टूर पॅकेज- या पॅकेजची लॉन्चिंग 23 फेब्रुवारीपासून हैदराबाद या ठिकाणाहून होणार आहे. याचा कालावधी सहा रात्री आणि सात दिवसांचा असून
या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला कन्याकुमारी तसेच मदुराई, रामेश्वरम, तिरुअनंतपुरम आणि त्रीची या ठिकाणी भेट देता येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये तुम्ही विमानाने प्रवास करणार आहात.
किती आहे तिकीट दर?
यामध्ये तर तुम्ही एकटे असाल तर 47 हजार 250 रुपये भरणे गरजेचे आहे. दोन व्यक्ती मिळून प्रवास करणार असाल तर प्रतिव्यक्ती 34 हजार 900 रुपये भरणे गरजेचे आहे.
तसेच पाच ते अकरा वर्षाचा मुलगा असेल तर आणि त्याकरिता बेड हवा असेल तर 28 हजार 900 रुपये भरावे लागतील व बेडशिवाय त्या मुलाकरिता 25 हजार 150 रुपये भरणे गरजेचे आहे.
3- मध्यप्रदेश टूर पॅकेज– या पॅकेजेची लॉन्चिंग 22 फेब्रुवारीपासून होणार आहे व कल्याण, मुंबई, पुणे, सुरत आणि वसई रोड पासून याची सुरुवात होणार असून प्रत्येक गुरुवारी ट्रेन असणार आहे. हे टूर पॅकेज पाच रात्री आणि सहा दिवसांचे आहे. या अंतर्गत तुम्हाला महेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन आणि इंदोर फिरण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
किती आहे तिकीट दर?
या टूर पॅकेजसाठी तुम्ही सिंगल असाल तर 35 हजार 100 रुपये भरणे गरजेचे आहे व दोन लोकांसोबत जाणार असाल तर प्रतिव्यक्ती 21 हजार 300 रुपये भरावे लागतील. तीन व्यक्ती मिळून प्रवास करायचा असेल तर प्रतिव्यक्ती 17 हजार 100 रुपये भरावे लागतील. तसेच तुमच्यासोबत पाच ते अकरा वर्षाचा मुलगा असेल आणि त्याला बेड हवे असेल तर त्याकरिता पंधरा हजार शंभर रुपये आणि बेड हवे नसेल तर 14,500 भरणे गरजेचे आहे.