Sleeper Vande Bharat:- सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतातील अनेक महत्त्वाचे शहरे व आध्यात्मिक ठिकाणांना जोडण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या एक्सप्रेसच्या माध्यमातून अनेक शहरे जोडली जावीत व प्रवाशांना देखील आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे.
या दृष्टिकोनातून जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मधून मुंबई ते शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपूर अशा मार्गांवर वंदे भारत ट्रेन सध्या सुरू आहेत.
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसून येत आहे.
या व्यतिरिक्त आता महाराष्ट्राला एक नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता असून ही देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन असणार आहे.
महाराष्ट्राला मिळणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसची भेट
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्राला भारतातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन भेट मिळण्याची शक्यता असल्याची माहिती एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेली असून ही ट्रेन दिल्ली ते मुंबई या मार्गावर सुरू केली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
जर ही ट्रेन सुरू झाली तर या प्रवासाचा बराच वेळ वाचणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. सध्या ज्या काही वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे त्यामध्ये एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या बोगी आहेत.
परंतु प्रवाशांना आता स्लीपर वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असून आता प्रवाशांना झोपून प्रवास करता येणे शक्य होणार आहे. दिल्ली ते मुंबई मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाऊ शकते असा देखील दावा या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे.
ही सुरू होऊ शकणाऱ्या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या बोगीमध्ये असणार आहे. यामध्ये अनेक प्रकारचे नवनवीन फीचर्स देण्यात आले असून या स्लीपर वंदे भारतमध्ये चढण्यासाठी पायऱ्या देखील आरामदायी बनवण्यात आले आहेत. याशिवाय व्हॅक्युम टॉयलेट,
इंटर कम्युनिकेशन दरवाजे व स्वयंचलित दरवाजांचा देखील समावेश असणार आहे. ही ट्रेन 160 किलोमीटर ताशी वेगाने धावू शकणार असून यामध्ये सस्पेन्शन सिस्टम देखील उत्तम असणार आहे.
एप्रिल महिन्यात होऊ शकते ट्रायल रन
मीडिया रिपोर्टचा विचार केला तर या वंदे भारतची ट्रायल रन एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता असून प्रथम ही गाडी दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते हावडा मार्गावर चालवली जाईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परंतु दिल्ली ते मुंबई या मार्गावर ही स्लीपर वंदे भारतीय एक्सप्रेस सुरू होईल अशी शक्यता जास्त आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिल्लीला कमीत कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. ही 16 डब्यांची स्लीपर वंदे भारत असणार असून हिचे डबे 20 ते 24 पर्यंत वाढवता देखील येऊ शकणार आहेत.