अहमदनगर शहरात डॉक्टरच्या घरामधून एक लाखाची रोकड लंपास

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : डॉक्टरच्या घराच्या खालील मजल्यावर असलेल्या क्लिनिकच्या लोखंडी शटरची पट्टी उचकटून आत प्रवेश करत घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत कपाटात ठेवलेली

१ लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नवनागापूर येथील आनंदनगर येथे रविवारी (दि.१८) सकाळी १०.४५ ते सोमवारी (दि.१९) सकाळी ९.३० या कालावधीत घडली.

याबाबत आयुब अकबर इनामदार (वय ५५, रा. आनंदनगर, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी इनामदार यांचे आनंदनगर येथे इनामदार क्लिनिक असून त्याच्या वरच्या मजल्यावर ते राहतात.

रविवारी (दि.१८) सकाळी १०.४५ च्या सुमारास घराला तसेच क्लिनिकच्या शटरला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी ते पुन्हा घरी आले असता त्यांना क्लिनिकच्या लोखंडी शटरची पट्टी उचकटलेली दिसली.

तसेच घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता कपाटातील १ लाखाची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe