IDBI Bank FD Scheme: आयडीबीआय बँकेने आणली चांगली कमाई करून देणारी 300 दिवसांची एफडी योजना! मिळेल इतके व्याज

Ajay Patil
Published:
fd scheme

IDBI Bank FD Scheme:- प्रत्येकजण नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमवत असतो व त्या पैशांची बचत करून गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येते. गुंतवणुक ही भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते.

त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार पैशांची गुंतवणूक करताना कोणत्या योजनांमधून किंवा कोणत्या गुंतवणूक पर्यायांमधून चांगला परतावा मिळेल या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचा पर्याय निवडत असते. यामध्ये गुंतवणूकदार विविध बँकांच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात

व याकरिता बँकांच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी अर्थात मुदत ठेव योजना सादर केल्या जातात. याच पद्धतीने जर आपण आयडीबीआय बँकेचा विचार केला तर  या बँकेने देखील एक आकर्षक व्याज देणारी एफडी योजना आणली असून या एफडी योजनेचे नाव आहे उत्सव एफडी  योजना हे होय.

ही योजना 300 दिवसांची असून या कालावधीमध्ये बँकेच्या या योजनेच्या माध्यमातून चांगला व्याजदर मिळत आहे.

 काय आहे आयडीबीआयच्या उत्सव एफडी योजनेचे स्वरूप?

 आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून 300 दिवसांची विशेष एफडी योजना सादर करण्यात आलेली असून या योजनेचे नाव आहे उत्सव एफडी योजना हे होय. या योजनेमध्ये बँक 7.55% व्याज देत आहे. सध्या आयडीबीआय बँकेचे 375 आणि 444 दिवसांची उत्सव एफडी योजना आहे.

या योजनांमध्ये अनुक्रमे 7.60% ते 7.75 टक्के इतका व्याजदर मिळत आहे. उत्सव एफडी योजना 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहेत. 375 दिवसांच्या आयडीबीआय बँकेच्या उत्सव एफडीमध्ये जे जेष्ठ नागरिक गुंतवणूक करतील त्यांना 7.60% व्याज मिळते तर नियमित ग्राहक,

एनआरआय आणि एनआरओ ग्राहकांना 375 दिवसांच्या एफडीवर 7.10% इतका व्याजदर दिला जात आहे.तसेच 444 दिवसांच्या उत्सव एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एनआरआय आणि एनआरओ यांना 7.25% व्याजदर देण्यात येणार आहे

व ४४४ दिवसांच्या या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के इतक्या दराने व्याज मिळणार आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वेळेपूर्वी पैसे काढण्याचा किंवा बंद करण्याचा पर्याय देखील दिला जातो. या दोन्ही पर्याय व्यतिरिक्त आता आयडीबीआय बँक तीनशे दिवसांच्या उत्सव एफडीमध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी देत आहे.

 आयडीबीआय बँकेचे नियमित मुदत ठेवीवरचे व्याजदर

1- सात ते 30 दिवसांच्या एफडीवर तीन टक्के

2- 31 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.25%

3- 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर चार टक्के

4- 91 ते सहा महिने कालावधीच्या एफडीवर 4.50%

5- सहा महिने एक दिवस ते एक वर्ष कालावधीच्या एफडीवर 5.75%

6- एक वर्ष ते दोन वर्ष( 375 दिवस आणि 444 दिवस एफडी वगळता) 6.80%

7- दोन वर्ष ते पाच वर्ष एफडीवर 6.50%

8- पाच वर्ष ते दहा वर्ष कालावधीच्या एफडीवर 6.25%

9- दहा वर्ष ते वीस वर्षे कालावधीची एफडीवर 4.80%

10- पाच वर्ष कालावधीच्या एफडीवर 6.50%

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe