TMC Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्या साठी उत्तम आणि चांगली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, ते जाणून घेणयासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.
वरील भरती अंतर्गत “चीफ रिसर्च फेलो (न्यूरोसर्जरी)” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्जासह मुलाखतीकरिता 07 मार्च 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहेत.
![TMC Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/02/TMC-Bharti-2024-.jpg)
वरील भरती करिता उमेदवाराकडे डीएम / एमसीएच किंवा एमएस / एमडीमध्ये किमान 02 वर्षांचा अनुभव असला पाहिजे. इच्छुक उमेदवाराने आपल्या अर्जासह ‘एचआरडी विभाग (प्रकल्प कार्यालय), टाटा मेमोरियल हॉस्पिटल, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, 4था मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – 400012 या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://tmc.gov.in/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे होणार आहे, उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
-लक्षात घ्या अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. तसेच मुलाखतीसाठी 07 मार्च 2024 रोजी कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे, मुलाखती येणयापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.