भारतातील सर्वाधिक सुरक्षित सेडान कार कोणत्या ? पहा यादी

Tejas B Shelar
Published:
India Safest Sedan Car List

India Safest Sedan Car List : भारतात फार पूर्वीपासून सेडान कारची लोकप्रियता आहे. अलीकडे तरुणांमध्ये नक्कीच एसयूव्ही कारबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळतात. SUV कार खरेदीला तरुण विशेष पसंती दाखवतात. मात्र असे असले तरी आजही अनेकजण Sedan Car खरेदी करत आहेत. तथापि ग्राहकांच्या माध्यमातून सेफ्टी कार खरेदीला विशेष महत्त्व दिले जात आहे.

Sedan असो की Suv, कार सेफ्टी असायला हवी, असा ग्राहकांचा माईंडसेट आहे. अशा परिस्थितीत आज आपण भारतातील सर्वाधिक सुरक्षित सेडान कार कोणत्या याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात सुरक्षित कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास ठरणार आहे.

ह्युंदाई व्हर्ना : ह्युंदाई ही एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. ह्युंदाई Verna देखील अशीच एक लोकप्रिय कार आहे. विशेष बाब अशी की, ग्लोबल NCAP ने Hyundai च्या या लोकप्रिय कारला कौटुंबिक सुरक्षिततेसाठी क्रॅश चाचण्यांमध्ये 5-स्टार रेटिंग सुद्धा दिले आहे.

त्यामुळे जर तुम्ही तुमच्या परिवारासाठी एखादी सुरक्षित कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. Hyundai Verna ला प्रौढ सुरक्षेसाठी 34 पैकी 28.18 गुण मिळाले आहेत तर मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 42 गुण मिळाले आहेत. भारतात या गाडीची एक्स-शोरूम किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 17.42 लाख रुपयांपर्यंत जाते.

Volkswagen Virtus : Volkswagen सुद्धा एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या गाड्या प्रामुख्याने आपल्या स्टाईल आणि लुक साठी विशेष ओळखल्या जातात. विशेष म्हणजे या कंपनीच्या गाड्या सेफ देखील आहेत. Volkswagen Virtus ही देखील अशीच एक कार आहे.

ग्लोबल NCAP ने कौटुंबिक सुरक्षेसाठी फॉक्सवॅगन व्हर्चसला क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग दिले असल्याची माहिती समोर आली आहे. ही सेडान कार कंपनीची भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार सुद्धा बनली आहे.

फोक्सवॅगन Virtus ला प्रौढांच्या सुरक्षेसाठी ३४ पैकी २९.७ गुण मिळाले आहेत तर मुलांच्या सुरक्षेसाठी या कारला ४९ पैकी ४२ गुण मिळाले आहेत. या कारची भारतातील किंमत 11.56 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलमध्ये 19.4 लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र या दिलेल्या किमती एक्स-शोरूम आहेत. अर्थातच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. 

स्कोडा स्लाव्हिया : स्कोडा कंपनीची ही देखील कार एक सेफ कार म्हणून ओळखले जाते. क्रॅश चाचण्यांमध्ये कौटुंबिक सुरक्षिततेसाठी स्कोडा स्लाव्हियाला ग्लोबल NCAP द्वारे 5-स्टार रेटिंग देखील दिले गेले आहे.

त्यामुळे जर तुम्ही तुमच्या परिवारासाठी एखादी सेफ गाडीच्या शोधात असाल तर ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते. याही गाडीचा तुम्ही विचार करू शकता.

या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर भारतात या गाडीची किंमत 11.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 19.13 लाख रुपयांपर्यंत जाते. तथापि या किमती एक्स शोरूम किमती आहेत म्हणजेच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe