Cancer Cover Policy: एलआयसीचा कॅन्सर कव्हर प्लॅन आहे फायद्याचा! आजच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा, वाचा प्लानची संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:
lic cancer cover plan

Cancer Cover Policy:- जीवन जगत असताना व्यक्तीवर अनेक प्रकारच्या समस्या अचानकपणे कोसळतात व मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता यामुळे निर्माण होते. कारण आपल्याला माहित आहे की भविष्यामध्ये काय होईल? हे कोणाला सांगता येत नाही.

बऱ्याचदा आपण पाहतो की सगळे व्यवस्थित चाललेले असते आणि अचानकपणे स्वतःला किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला गंभीर आजार ग्रासतो व चांगली सुस्थितीत चाललेली कुटुंबाची घडी अचानक विस्कळते. कारण आरोग्याच्या बाबतीत कोणाला कुठली समस्या केव्हा निर्माण होईल हे काहीच सांगता येत नाही.

त्यामुळे अशा आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीचा आर्थिक दृष्टिकोनातून सामना करता यावा म्हणून बरेच जण आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स घेतात. कारण बरेच आजार असे असतात की त्यांचा खर्च हा प्रत्येकालाच परवडेल असे नसते.

त्यामुळे अशा परिस्थितीत आरोग्य विम्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. अशा दुर्धर आजारांमध्ये जर आपण कॅन्सर सारख्या आजाराचा विचार केला तर हा आजार म्हटले म्हणजे या आजारावर उपचार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो व हा खर्च प्रत्येकालाच करता येणे शक्य आहे असे नाही.

सध्या जर आपण कॅन्सरचे प्रमाण पाहिले तर दिवसेंदिवस वाढतच असून अचानकपणे बऱ्याच व्यक्ती कॅन्सरला बळी पडल्याचे आपण ऐकतो. मोठ्या माणसांप्रमाणे अगदी लहान वयाच्या मुलांमध्ये देखील आता कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.

त्यामुळे भविष्यकाळात आपण तयार राहणे गरजेचे असून आर्थिक स्तरावर आपण कॅन्सरची लढा देऊ शकू या प्रमाणात स्वतःला सक्षम करणे खूप गरजेचे आहे.

त्यामुळे या अनुषंगाने या लेखात आपण एलआयसीच्या कॅन्सर कव्हर पॉलिसीबद्दल महत्वाची माहिती घेणार आहोत जी पॉलिसी या आजारासाठी लागणारा खर्च कव्हर करण्यासाठी आपल्याला मदत करते.

 हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी

 अनेक कंपन्यांच्या माध्यमातून कॅन्सरवर आधारित विमा पॉलिसी देण्यात येतात. परंतु यामध्ये एलआयसीच्या माध्यमातून एक कॅन्सर कव्हर प्लान तयार करण्यात आलेला आहे. दुर्दैवाने जर आपल्या कुटुंबात किंवा स्वतःला कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले तर उपचारासाठी हातात पैसे असणे खूप गरजेचे असते.

यामध्ये उपचारा सोबत अनेक लहान मोठ्या खर्चासाठी देखील पैसा आवश्यक असतो. हा सगळा खर्च एलआयसीची कॅन्सर कव्हर पॉलिसी कव्हर करते. एलआयसीच्या या कॅन्सर कव्हर पॉलिसीमध्ये शंभर टक्के उपचार कव्हर उपलब्ध असून दर महिन्याला एक टक्का कव्हर उपलब्ध आहे.

समजा यामध्ये तुमचा कॅन्सर कव्हर 30 लाख रुपये असेल तर तुम्हाला पुढील दहा वर्षाकरिता प्रत्येक महिन्याला तीस हजार रुपये मिळतात. कॅन्सरवरील उपचारामुळे विमाधारकाची नोकरी किंवा व्यवसाय दोन्ही प्रभावित होण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीत तुम्हाला एलआयसी कॅन्सर कव्हर पॉलिसीच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणारी एक टक्का रक्कम तुमचे आर्थिक दृष्ट्या झालेले नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते. समजा उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला हे मासिक उत्पन्न मिळते.

 कसा आहे एलआयसीचा कॅन्सर कव्हर प्लान?

 कॅन्सरचे स्वरूप लहान म्हणजेच तीव्रता कमी असेल तर तुम्हाला एकूण कव्हरपैकी 25% रक्कम मिळते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुमचा कव्हर तीस लाख रुपयांचा असेल तर उपचाराकरिता तुम्हाला 25% प्रमाणे साडेसात लाख रुपये मिळतात.

जर कॅन्सर गंभीर अवस्थेत असेल किंवा पोचेल तेव्हा उरलेली रक्कम देण्यात येते. याकरिता तुम्ही वर्षाला तीन हजार रुपयांची कॅन्सर पॉलिसी घेऊ शकतात. तुम्ही जर तीन हजार रुपये प्रति वर्षासाठी भरले तर तुम्हाला 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण या माध्यमातून मिळते.

एवढेच नाही तर प्रत्येक महिन्याला 250 रुपये भरून तुम्ही कॅन्सर कव्हर पॉलिसी घेऊ शकतात. या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी वय हे 30 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे एलआयसीच्या या कॅन्सर कव्हर पॉलिसीमध्ये आजाराचे निदान ते उपचार आणि मासिक उत्पन्नापर्यंत सर्व गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe