कानपूर लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणीदायक काही सुखदायक गोष्टी घडल्या. अनेकांचे रोजगार बुडाले तर अनेक बेघर झाले.
विवाहेच्छुकांची तर खूपच तारांबळ झाली. अनेकांची लग्ने रखडली तर अनेकांची मोडली. पण अशात उत्तर प्रदेशातील कानपूर इथं एक अनोखी घटना घडली.
रस्त्याच्या कडेला भीक मागून जीवन जगणाऱ्या तरुणीच्या प्रेमात तरुण पडला. हा तरुण फुटपाथवरील लोकांना जेवण वाटत होता.
त्यावेळी मुलीच्या प्रेमात पडला आणि थेट लग्नच केलं. तरुणीचे वडील जिवंत नाहीत तर आईला पॅरालिसिस झाला आहे. भाऊ आणि वहिनीने तिला मारहाण करून घरातून बाहेर काढलं होतं.
गरीबीमुळे तरुणीला एकवेळचं जेवण मिळणं कठीण होतं. त्यामुळे फुटपाथवर भिकाऱ्यांसोबत बसून ती दिवस ढकलत होती. या लोकांना तरुण दररोज जेवण पुरवत असे.
शेवटी तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला. अनेकांनी तरुणाच्या या निर्णयाचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. जेवण वाटताना अनिलला तरुणीबद्दल समजलं.
त्याच काळात अनिलचं तरुणीवर प्रेम बसलं आणि त्याने तरुणीला लग्नाची मागणी घातली. अनिल प्रॉपर्टी डिलरकडे ड्रायव्हरची नोकरी करतो. अनिलचं लग्न लावून देण्यात त्याचे मालक लालता प्रसाद यांनी महत्वाची भूमिका बजावली.