Ahmednagar News : राजकीय चालीमुळे विकासकामे रेंगाळली जातात. समाजाच्या विकास कामात कोणीही राजकीय चाल करू नये. काम कुणी केले ? हे सर्वसामान्यांना सगळे माहीत असते.
श्रेय कोणी घेतले तरी चालेल, मात्र नागरिकांची विकासकामे थांबवून त्यांना त्रास देण्याचा व अडचणीत आणण्याचे काम कोणी करु नये. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त केडगाव भूषणनगर येथे संत रविदास महाराज सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संत रोहिदास महाराज सेवा संघाचे निलेश बांगरे, विजय घासे, माजी नगरसेवक अशोक कानडे,
शिवाजीराव साळवे, नगरसेवक संपत बारस्कर, माजी नगरसेवक सुनील कोतकर, प्रताप काळे, प्रा. माणिक विधाते, गजेंद्र भांडवलकर, दत्ता खैरे, कांबळे सर, दिनेश देवरे, हरिशचंद्र आखाडे,
अशोक घेवरे, कैलास घेवरे, सुभाष बागळे, सुभाष साळवे, प्रा. सुभाष चिंधे, सुभाष बागडे, जगदीश घेवरे, कन्हैयालाल परदेशी, योगेश डोंगरे, माणिक लव्हाळे, संतोष शेळके,
अजय शेळके, वैभव घासे, विशाल डोंगरे, सुरजमल डोंगरे, चंपालाल धनवटे, जयराज शेळके, मयूर बांगरे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
प्रास्ताविकात निलेश बांगरे म्हणाले की, समाजाचे विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची जागा नव्हती, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने सदर सभागृहाचे काम मार्गी लागले आहे.
या जागेमुळे होणाऱ्या सभागृहात समाजाला बसण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे. अशोक कानडे म्हणाले की, चर्मकार समाजातील उपेक्षित घटकांचे अनेक प्रश्न आहे.
समाज एकत्र आल्यास त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराज शेळके यांनी केले. आभार मयूर बांगरे यांनी मानले.