दिल्लीतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या कथित प्रियकराची कोरोनाची मदत घेत हत्या केली आहे.
त्या व्यक्तीने पत्नीच्या प्रियकरला विष देण्यासाठी बनावट कोव्हिड-19 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रदीप असे या व्यक्तीचे नाव असून पत्नीचे होमगार्डसोबत संबंध असल्याचा त्याला संशय होता. पोलिसांनी प्रदीपला अटक केली आहे. दोन महिला आरोग्य कर्मचारी बनून पीडित व्यक्तीच्या दिल्ली येथील अलिपूर भागातील घरी गेल्या.
या महिलांनी होमगार्ड व त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून वाचण्यासाठी विष असलेले औषध दिले. हे औषध घेतल्यानंतर ते सर्वजण आजारी पडले.
या दोन्ही महिला प्रदीपच्या दुकानात काम करतात. त्यांनी कुटुंबाला विष देण्यासाठी दोघींना प्रत्येकी 200 रुपये दिले होते. या महिलांना अटक करण्यात आली आहे.