अहमदनगर :- जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारात प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यात मुलीचा मृत्यू झाला, तर मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
अवंतिका रघुनाथ दळवी (२१, कडा, ता. आष्टी) असे मृत युवतीचे नाव असून, मुकुंद बाबासाहेब भोजने या तरुणावर उपचार सुरू आहेत. या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.
परंतु लग्नाला घरच्यांचा विरोध होता. मंगळवारी रात्री नगर-जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारातील बंद पडलेल्या हॉटेलमध्ये त्यांनी गळफास घेतला.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, काल रात्री ते नगर जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारात असणा-या एका बंद पडलेल्या हॉटेलमध्ये गेले होते.
तेथे दोघांनी गळफास लावून घेतला. मुलाचे नातेवाईक त्यांना शोधत आले होते. त्यावेळी बंद पडलेल्या हॉटेलमध्ये ते दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले.
त्यांनी नातेवाइकांनी तातडीने दोघांना खाली घेऊन नगर येथे एका खासगी रुग्णालयात आणले. उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला आहे, तर युवक बेशुद्ध असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
- Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 रिक्त जागांसाठी भरती सुरू; करा
- एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘
- सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त
- 1 लाखपेक्षा जास्त किंमत असलेली टीव्हीएसची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 86 हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी! या ठिकाणी मिळेल भन्नाट डील
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?