विनाकारण फिरणाऱ्या कोरोनामुक्त झालेल्या दोघांवर गुन्हा

Ahmednagarlive24
Published:

सध्या कोरोनाचा प्रसार पाहता प्रशासन खूप काळजी घेत आहे. संचारबंदीचे अनेक नियम लागू केले आहेत. परंतु नागरिक म्हणावे असे सहकार्य प्रशासनास करत नाहीत.

अशीच एक घटना मुकुंदवाडी भागातील संजयनगर व रामनगर भागात बरे झालेले कोरोना रुग्णांबाबत घडली आहे. बरे झाल्यानंतर घरात बसने गरजेचे असतानाही ते पुन्हा फिरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.

त्यांनतर त्यांनी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत. एका बाजूला सर्व प्रशासकीय यंत्रणा करोनाचा प्रसार रोखला जावा म्हणून प्रयत्न करत असतानाही लोकांकडून मात्र त्यांना सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

बऱ्याच प्रमाणात या भागातील टाळेबंदी कडक करण्यात आली आहे. मात्र, अजूनही लोक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरात प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्यत्र सकाळी ७ ते दुपारी एक वाजेपर्यंतचे व्यवहार काहीसे सुरळीत होत आहेत. मात्र, सकाळच्या सत्रात महिलांचे जथ्थे कामाच्या शोधात बाहेर पडताना दिसतात.

प्रतिबंधित क्षेत्रातील वावर रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची पायी गस्त पथके काम करत असून प्रत्येक चमूकडे आता ध्वनिवर्धकही देण्यात आले आहेत.

दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सत्रात २६ रुग्णसंख्या वाढल्याने आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या एक हजार २१८ एवढी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यच्या ग्रामीण भागातही आता विषाणू पाय पसरू लागला आहे. गंगापूर तालुक्यातील फूलशिवरा, कन्नड तालुक्यातील धनगरवाडी,, पिसादेवी या भागात करोना रुग्ण आढळून आले आहेत.

खुलताबाद येथेही रुग्ण आढळले होते. मात्र, अनेक भागातून प्रशासनाला सहकार्य होत असल्याने हे आकडे वाढण्याची शक्यता नाही.

मात्र, शहरी व्यक्ती गावातील नातेवाइकांकडे मुक्कामी थांबत आहेत. परिणामी ग्रामीण भागातही करोना विषाणू पोहोचत आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात गुन्हे दाखल करेपर्यंत प्रशासनाला करवाई करावी लागत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment