सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून अबाल वृद्धांपर्यंत कोणालाही याची लागण होऊ शकते. नुकतीच गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात जनमालेल्या नवजात जुळ्या बाळांना करोनाची लागण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
ही जुळी बाळं करोनाची लागण झालेले सर्वात लहान वयाचे रुग्ण ठरले आहेत. या बालकांची आई मोलीपूर गावात राहत होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
१६ मे रोजी महिलेने वाडनगर सिव्हील रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला. ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. नवजात बाळांना आणि त्यातही जुळ्यांना करोनाची लागण झाल्याची ही पहिलीच केस आहे,
” अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नवजात मुलाचा रिपोर्ट १८ मे रोजीच आला होता. तर मुलीचा रिपोर्ट शुक्रवारी आमच्याकडे आला असं मनोज दक्षिणी यांनी सांगितलं आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.