Ahmednagar News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांबाबतची कामे अतुलनीय आहेत. त्यांच्या कामाचे नियोजन अत्यंत परफेक्ट असते. त्यांच्या कामाचे विरोधक देखील कौतुक करतात. काल (२६ फेब्रुवारी) विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी ते अहमदनगरमध्ये आले होते.
यावेळी त्यांनी आणखी मोठी घोषणा केली. नगरमधील बायपास रस्ता व नगर करमाळा रस्ता अशा तीन हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे उपस्थित होते

नगर शहराच्या बाहेरून नवा रास्ता
शिरूर ते पुणे असा असा उड्डाण पूल, त्यावर मेट्रो असे ५० हजार कोटींचे उड्डाणपूल मंजूर आहेत व कामेही सुरु आहेत. आता शिरूर ते छत्रपती संभाजीनगर असा नवीन महामार्ग करायचा निर्णय घेतला आहे. नगर शहराच्या बाहेरून हा रस्ता जाणार आहे. यामुळे पुणे ते संभाजीनगर अंतर दोन तासांत व पुणे ते नगर एक तासात पार करता येईल असे मंत्री गडकरी म्हणाले.
नागपूर पुणे अंतर अवघ्या साडेचार तासात
मंत्री गडकरी म्हणाले की, या रस्त्यासाठी लाइन आऊट निश्चित झालेला आहे. पुणे-छत्रपती संभाजीनगर दोन तासांत पूर्ण होईलच, त्यापुढे समृद्धी महामार्गाने नागपूरला जाता येईल. सुमारे साडेचार तासात नागपूर पुणे अंतर कापता येईल. यामुळे विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
‘या’ नवीन 3 कामांची घोषणा
माळशेज घाट, अणे घाट, नगर बायपास, खरवंडी कासार ते छत्रपती संभाजीनगर-सोलापूर रस्त्यावर एनएच ५२ जंक्शनपर्यंत १६३ किमी ४०० कोटी खर्चाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. नगर ते सबलखेड, आष्टी व चिंचपूर या ५० किमीच्या कामासाठी ६७० कोटी, नांदूर शिंगोटे ते कोल्हार या ४८ किमी रस्त्यासाठी ३५० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री गडकरी यांनी केली.