अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खुनाचा अखेर उलगडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  अहमदनगर शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती शिवारात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी बुरूडगाव येथील एकास अटक केली आहे.

18 एप्रिल सायंकाळी चार वाजता सुमारास कल्याण हायवेवरील नेप्ती शिवारातील रोडच्या पुलाखाली मोरीत एक कुजलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडले होते.

त्याठिकाणी तात्काळ नगर तालुका पोस्टे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी भेट दिली. प्रेताची पाहणी करुन तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रेताची व घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली .

त्यानंतर सदरचे अनोळखी पुरुष जातीचे प्रेत पी.एम.साठी सिव्हिल हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले. त्यावरुन नगर तालुका पोस्टे येथे आ.मृ रजिन 53/2020 सीआरपीसी , 174 प्रमाणे दाखल झाला .

सदर तपासात नंदा रघुनाथ बर्डे (वय 35 वर्षे, धंदा घरकाम रा.नालेगाव) हिचे पती घरातून निघून गेल्याचे समजले. त्यावरुन तिला सदरचे प्रेत दाखविण्यात आले. नंदा बडे हिने ते प्रेत पाहून तो तिचा पती रघुनाथ एकनाथ बर्डे असल्याबाबत साशंकता व्यक्त केली.

दि .19 / 04 / 2020 रोजी प्रेतावर पी.एम.करण्यात आले पी.एम. नोटस मधे डॉक्टरांनी प्रेताचा गळा दाबुन मृत्यु झाला आहे असा अभिप्राय दिल्याने नगर ता.पोस्टे येथे गुरन 189/2020 भादवि क .302,201 प्रमाणे दाखल झाला, तपासात मयताची डी.एन.ए.सैम्पलींग करण्यात येवुन त्याद्वारे ते प्रेत रघुनाथ एकनाथ बर्डे रा.नालेगाव ता.जि.अहमदनगर याचे असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथके तयार करुन रवाना करण्यात आले. त्याप्रमाणे सपोनि शंकरसिंग राजपूत व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने यातील आरोपींचा शोध घेत असताना सपोनि शंकरसिंग राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत समजले की बुरुडगावात राहणारे मच्छींद्र बाबुराव म्हस्के हा मयत रघुनाथ बर्ड उर्फ रघु याचे सोबत नेप्ती शिवारात दिसला होता.

त्याशिवाय इतर दृष्टीकोनातून सुध्दा तपास करण्यात आला. मच्छींद्र बाबुराव म्हस्के (वय- 48 वर्ष धंदा – हॉटेल कामगार रा.नेप्ती शिवार, अहमदनगर) यास विश्वासात घेवुन वारवार त्यांच्याकडे बारकाईने मयत रघुबाबत विचारपुस केली असता त्याने कबुल केले की, रघुला रोडचे पुलाखाली असलेल्या मोरीत गळा दाबुन मारले आहे.

तशी कबुली दिल्याने मच्छींद्र बाबुराव म्हस्के (वय . 48 वर्ष रा.बुरुडगाव ता.जि.अहमदनगर) यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास योग्य रितीने सुरु आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment