RBI Breaking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील 3 मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. RBI च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँक यांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या तीनही बँकांना सुमारे तब्बल 3 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी RBI कडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे ज्यामध्ये 3 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावल्याची माहिती देण्यात आली आहे.
SBI ला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील मोठ्या SBI बँकेला तब्बल सुमारे 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकांनी काही कंपन्यांच्या पेड-अप शेअर कॅपिटलच्या 30% पेक्षा जास्त रकमेचे शेअर्स तारण ठेवले. उपकलमच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे RBI ने दंड ठोठावला आहे.
कॅनरा बँकेला 32 लाखांहून अधिक दंड
6 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कॅनरा बँकेला 32.30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दिली आहे. कॅनरा बँकने नाकारलेला डेटा दुरुस्त करण्यात आणि CIC कडून असा नकार अहवाल मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (CIC) वर अपलोड करण्यात अयशस्वी ठरली असल्याने हा दंड आकारण्यात आला आहे.
सिटी युनियन बँकेला 66 लाखांचा दंड
RBI कडून सिटी युनियन बँकेला देखील 66 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँक उत्पन्न ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण आणि अग्रिम तसेच केवायसीशी संबंधित नियमांचे पालन न केल्याने बँकेला हा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
ग्राहकांना याचा फटका बसणार का?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात मोठ्या बँकांवर कारवाई केल्याने आता ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. बँकांवर केलेली कारवाई नियामक अनुपालनातील त्रुटींवर असल्याचे RBI कडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहक आणि बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही.