Investment Tips:- गुंतवणूक ही भविष्यकालीन आर्थिक समृद्धी किंवा आर्थिक मजबुतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून प्रत्येक व्यक्ती जो काही पैसा कमावतो त्या पैशांची बचत करून चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतो. गुंतवणूक करताना आपल्याला ज्या ठिकाणाहून गुंतवणुकीवर मिळणारा परतावा चांगला मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक केली जाते.
तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर महत्त्वाचे एक तत्व पाहिले तर गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी करणे गरजेचे असते व त्यामध्ये सातत्य ठेवणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. गुंतवणुकीसाठी फार मोठ्या रकमेचीच गुंतवणूक करायची असते असे नाही तर अगदी छोट्या रकमेची गुंतवणूक करून आणि त्यामध्ये सातत्य ठेवून तुम्ही काही वर्षात खूप चांगला पैसा जमा करू शकतात.
जर आपण गुंतवणूक योजनांचा विचार केला तर यामध्ये अशा योजना आहेत की यामध्ये तुम्ही कमीत कमी रक्कम गुंतवून देखील खूप चांगला पैसा जमा करू शकतात. त्यामुळे या लेखात आपण अशा योजना पाहणार आहोत की ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये जमा करून काही वर्षात लाखो रुपये मिळवू शकतात.
फायद्याच्या गुंतवणूक योजना
1-पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी–ही सरकारी योजना असून या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी दरवर्षी किमान पाचशे रुपये जमा करणे गरजेचे आहे. या ऐवजी जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावे दरमहा पाचशे रुपये जमा केले तर तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकतात.
या योजनेमध्ये तुमच्या पैशांवर 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याजाचा लाभ दिला जातो. या योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा आहे. तुम्ही जर प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये जमा केले तर एका वर्षामध्ये तुम्ही सहा हजार रुपये जमा करता आणि पंधरा वर्षात 90 हजार रुपये जमा होतात.
जर आपण पीपीएफ योजनेचे कॅल्क्युलेटर नुसार पाहिले तर पंधरा वर्षात या योजनेत तुम्हाला 72 हजार 728 रुपये व्याजाचा लाभ मिळतो. तुमची एकूण मुद्दल आणि व्याज मिळून या योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला एक लाख 62 हजार 728 रुपये मिळतात. पंधरा ऐवजी जर तुम्ही या योजनेत पाच वर्षांची वाढ केली म्हणजेच वीस वर्षांपर्यंत पैसे जमा केले तर तुम्हाला दोन लाख 66 हजार 332 रुपये मिळतात.
2- एसएसवाय अर्थात सुकन्या समृद्धी– सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी असलेली योजना असून या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात करणे खूप गरजेचे आहे. या योजनेत तुम्ही प्रत्येक वर्षाला कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकतात.
सध्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 8.20% व्याज मिळते व या योजनेत तुम्हाला पंधरा वर्षांकरिता गुंतवणूक करावी लागते व या योजनेचा परिपक्वता कालावधी 21 वर्षांचा आहे. या योजनेमध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये गुंतवले तर पंधरा वर्षांमध्ये तुम्ही 90 हजार रुपये गुंतवतात.
पंधरा वर्षानंतर मात्र तुम्ही 21 वर्षाच्या कालावधीपर्यंत कुठलीही गुंतवणूक करत नाहीत. तुम्हाला फक्त पंधरा वर्षे गुंतवणूक करावी लागते. यामध्ये तुम्ही जी काही गुंतवणूक कराल त्या रकमेवर 8.20% दराने व्याज जोडले जाते. पंधरा वर्षानंतर तुमची एकूण मुद्दल आणि व्याज मिळून तुम्हाला दोन लाख 77 हजार 103 रुपये मिळतात.
3- म्युच्युअल फंडातील गुंतवणूक– जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल तर म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. सरासरी यामध्ये 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो.
त्यामुळे दिर्घ कालावधीपर्यंत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही तुमच्या मुलांकरिता चांगली रक्कम जमा करू शकतात. त्यामध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गुंतवलेली रक्कम वाढवू शकतात.
त्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये गुंतवले तर पंधरा वर्षानंतर 12% व्याजदराने तुम्हाला दोन लाख 52 हजार 288 रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून मिळतात. यामध्ये जर तुम्ही पंधरा वर्षे ऐवजी पाच वर्ष वाढ करून जर वीस वर्षे गुंतवणूक केली तर बारा टक्के व्याजदराने तुम्हाला चार लाख 99 हजार 574 रुपये मिळतात.