जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरीब, सर्व सामान्य नागरीकांचे मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भौतिक सुविधा निर्माण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे इतर सर्व विकास कामांच्या आधी शाळा खोल्यांच्या प्रलंबीत कामासाठी जिल्हा विकास आराखडयातून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
पाचुंदा ता. नेवासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील दोन वर्ग खोल्याचे भुमिपूजन खासदार सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, अमोल सागडे, बापुसाहेब पाटेकर, आदिनाथ ठोंबरे, कारभारी टकले, चंद्रकांत खरात, अविनाश वाघमोडे, पोपट वाघमोडे, दादा भिसे, नवनाथ माने, तुकाराम हुंडे, उमेश हंडाळ, अशोक ठोंबरे आदी उपस्थित होते.

यावेळी विखे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अजुनही आपली मुले उघडयावर शिक्षण घेत आहेत ही दुर्देवाची गोष्ट आहे. जाती धर्माच्या पलीकडे जावून माणसाला माणूस म्हणून जवळ करण्याचे काम स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी शिकवले. त्यामुळेच विखे कुटूंबाची चौथी पिढी जनतेने स्विकारली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शाळा खोल्या व शेतीसाठी शेतीच्या वीज पुरवठयासाठी रोहीत्र देण्याची विशेष आर्थिक तरतुद जिल्हा नियोजन मंडळात केली आहे.
यावेळी विठ्ठलराव लंघे म्हणाले की, मतदार संघाच्या पलीकडे जावून सर्व सामान्यांच्या हितासाठी विखे कुटूंबाने जिल्हाभर योगदान दिले आहे. सरकारच्या माध्यमातून नेवासा तालुक्यात विविध विकास कामांसाठी लोकप्रतिनिधी नसतांना देखील त्यांच्या मार्फत निधी मिळतो आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आदिनाथ ठोंबरे यांनी केले. तर भाऊसाहेब होंडे यांनी आभार मानले. एखादया कामाचा किती चिवटपणे पाठपुरावा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गावातील युवक आदिनाथ ठोंबरे हे आहेत.
गेल्या पाच वर्षापासून प्रलंबीत असलेल्या शाळा खोल्याचा प्रश्न त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा करुन मार्गी लावला आहे. अशा धडपडया कार्यकर्त्यांमुळे मला मतदार संघाच्या बाहेर येवून भुमिपूजन करावे लागले. अशा कार्यकर्त्यांना जिवापाड सांभाळण्यांची शिकवण आम्हाला स्व. बाळासाहेब विखे यांनी दिली आहे.