Indian Navy Recruitment 2024:- सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून अशा भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मोठ्या प्रमाणावर एक सुवर्णसंधी असल्याचा हा कालावधी आहे.
यामध्ये विविध बँकांच्या तसेच आर्मी, राज्य सरकारच्या जिल्हा परिषद अंतर्गत देखील विविध भरती प्रक्रिया सध्या राबविण्यात येत असून त्यांच्या नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आले आहेत. या अनुषंगाने जर आपण इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदलाचा विचार केला
![indian navy recruitment 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/02/a-200.jpg)
अनेक तरुण-तरुणी इंडियन नेव्ही मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बघत असतात व अशा तरुणांसाठी आता एक आनंदाची बातमी असून इंडियन नेव्ही मध्ये तब्बल २५४ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार असून या भरतीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
इंडियन नेव्हीमध्ये होणार 254 जागांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंडियन नेव्हीमध्ये एकूण 254 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ही भरती प्रामुख्याने शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर( एसएससी) पदासाठी राबवण्यात येणार आहे.
पदाचे नाव व एकूण रिक्त पदे
1- एक्झिक्यूटिव्ह ब्रांच– एसएससी जनरल सर्विस(GS/XI) एकूण रिक्त पदे 50, SSC पायलट एकूण रिक्त पदे वीस, सिव्हिल एयर ऑपरेशन्स ऑफिसर एकूण रिक्त पदे 18, SSC एअर ट्रॅफिक कंट्रोलर एकूण रिक्त पदे आठ, एसएससी लॉजिस्टिक्स एकूण रिक्त पदे 30 आणि एसएससी नेवल आर्मीट इन्स्पेक्शन कॅडर एकूण रिक्त पदे दहा
2- एज्युकेशन ब्रांच –SSC एज्युकेशन एकूण रिक्त पदे 18
3- टेक्निकल ब्रांच– एसएससी इंजिनिअरिंग ब्रांच(GS) एकूण रिक्त पदे 30, एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच(GS) एकूण रिक्त पदे 50 आणि नेव्हल कॉन्ट्रॅक्टर एकूण रिक्त पदे वीस
भरतीसाठी पदनिहाय शैक्षणिक पात्रता
1- एक्झिक्यूटिव्ह ब्रांच– बीई/ बी टेक किंवा बीएससी/ बीकॉम/ बीएससी( आयटी)+ पिजी डिप्लोमा फायनान्स / लॉजिस्टिक्स / सप्लाय चेन मॅनेजमेंट / मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA/ एमएससी( आयटी)
2- एज्युकेशन ब्रँच– प्रथम श्रेणी एमएससी( मॅथ/ ऑपरेशनल रिसर्च)/( फिजिक्स/ अप्लाइड फिजिक्स/ केमिस्ट्री) किंवा 55% गुणांसह एमए( इतिहास)
3- टेक्निकल ब्रांच– 60% गुणांसह BE/ बी टेक
या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा
या भरतीसाठी पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. ( प्रत्येक पदासाठी ते वेगवेगळे असेल)
किती लागेल अर्ज शुल्क?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
निवड झाल्यानंतर कुठे करता येईल नोकरी?
या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही नियुक्ती देण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?
भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना दरमहा 56 हजार शंभर रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
या भरती विषयी महत्त्वाच्या तारखा
या भरतीच्या अर्ज प्रक्रियेला 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झालेली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा मार्च 2024 आहे.