Business Idea:- सध्या नोकऱ्याची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून बेरोजगारी हा भारतापुढील ज्वलंत प्रश्न आहे. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःचा व्यवसाय उभारता यावा म्हणून शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात.
जेणेकरून अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत अशा तरुणांना करण्यात येते व त्यांना व्यवसाय उभारणीस मदत मिळते. तसेच या व्यतिरिक्त बरेच व्यक्ती हे व्यवसाय करायचा हे निश्चित करतात. परंतु कोणता व्यवसाय करावा? यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो.

तसेच एखादा व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक देखील विचारात घेतली जाते. त्यामुळे आपण या लेखामध्ये असा एक व्यवसाय बघणार आहोत जो तुम्ही सुरू करून लाखो रुपये मिळवू शकतात. त्यामुळे या व्यवसायाची थोडक्यात माहिती आपण या लेखात बघू.
ब्रेड तयार करण्याचा व्यवसाय करा आणि लाखोत पैसा मिळवा
जर तुम्ही ब्रेड तयार करणे म्हणजेच ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग चा व्यवसाय केला तर आजच्या कालावधीत ब्रेडच्या वाढत्या मागणीला अनुसरून पाहिले तर तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला ब्रेड बनवण्यासाठी चा कारखाना म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणे गरजेचे राहील
व साहजिकच यासाठी तुम्हाला जमिनीची आवश्यकता असेल तसेच इमारत, लागणारी आवश्यक यंत्रसामग्री तसेच वीज व पाण्याची सुविधा आणि कर्मचारी इत्यादी गोष्टी तुम्हाला लागतील.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुमच्याकडे उत्तम असा बिजनेस प्लॅन असणे गरजेचे आहे.
या व्यवसायासाठी किती पैसा गुंतवावा लागेल?
या व्यवसायात लागणाऱ्या गुंतवणुकीचा विचार केला तर तुम्ही किती प्रमाणामध्ये या व्यवसायाला सुरुवात करणार आहात त्यावर गुंतवणूक कमी अधिक होऊ शकते. जर तुम्ही छोट्या प्रमाणामध्ये या व्यवसायाला सुरुवात केली तर तुम्हाला कमी पैसे लागतील व मोठ्या प्रमाणावर तुम्हाला या व्यवसायाची सुरुवात करायची असेल
तर साहजिकच याकरता तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागेल. तरी देखील अल्प प्रमाणात सुमारे पाच लाख रुपये यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवणूक गरजेचे आहे व या गुंतवणुकी शिवाय किमान एक हजार चौरस फूट जागेची आवश्यकता तुम्हाला भासेल
व या जागेवर तुम्ही जेणेकरून कारखाना सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या ठिकाणी व्यवसायाची करावी लागेल नोंदणी
ब्रेड हे अन्न असल्यामुळे मानवाच्या आरोग्याची त्याचा सरळ संबंध येतो. याकरिता तुम्हाला या व्यवसायाची नोंदणी करणे गरजेचे असून तुम्हाला एफएसएसआय कडून फूड बिजनेस ऑपरेशन परवान्यासाठी अर्ज करणे गरजेचे राहील.
ब्रेड बनवण्याच्या व्यवसायातून तुम्ही किती कमाई करू शकतात?
आज आपल्याला माहित आहे की तुम्ही एक ब्रेडचे पॉकेट घेतले तर त्याची किंमत साधारणपणे 40 ते 60 रुपयांच्या दरम्यान आहे. परंतु ब्रेड बनवण्याची किंमत यामानाने खूपच कमी असल्याने जर तुम्ही तुमच्या युनिट मधून एकाच वेळी जास्त उत्पादन घेतले
व परफेक्ट अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी राबवली तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या आजूबाजूच्या स्थानिक मार्केटला टार्गेट करावे लागेल व त्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करून मागणीनुसार वेळेत पुरवठा करावा लागेल.