अहमदनगर :- नगर शहरातील बसस्थानकासमोर बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यूप्रकरणी दोघांना अटक झाली आहे.
शेख फैजान अब्दुल रौफ ऊर्फ फैजान बाबासाहब जहागीरदार (वय 26), शेख अराफत अब्दुल रौफ उर्फ अराफत बाबासाहब जहागीरदार (वय 24, दोघे रा. खिस्त गल्ली, नगर) ही अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 29 एप्रिल रोजी किरण उध्दव जगताप या तरुणाला किरकोळ कारणावरुन डोक्यावर मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
सदर घटनेबाबत जखमीचे वडील उध्दव यशवंत जगताप (वय 43, रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन, नगर) यांनी अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान जखमी किरण जगताप याचेवर आनंदऋषी हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना मंगळवारी निधन झाले होते.
आरोपी हे पुण्यातील कोंढवा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे स्टेशन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती.
औताडे यांनी गुन्ह्यातील आरोपी फैजान जहागीरदार हा त्याचे साथीदारांसह कोंढवा, पुणे परिसरात लपून बसलेला आहे.
त्यावरून पोलिसांनी कोंढवा, पुणे येथे जावून मिळालेल्या माहीतीनूसार कोंढवा परिसरात आरोपींचा शोध घेवून दोघांना अटक केली आहे.
- सापाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ‘ही’ वस्तू ! तुमच्या घरात ‘ही’ वस्तू आवर्जून ठेवा साप घरात चुकूनही येणार नाही
- अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन-चांदी नाही तर ‘या’ वस्तू खरेदी करणं मानलं जात सर्वाधिक शुभ ! 50-100 रुपयांच्या वस्तूने चमकणार तुमच नशीब
- अहिल्यानगरसहित महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वेस्थानकांचे होणार आधुनिकीकरण ! तुमच्या शहरातील रेल्वे स्थानकाचा समावेश आहे का ? वाचा सविस्तर
- 10वी आणि 12वी चा निकाल केव्हा लागणार ? समोर आली नवीन तारीख
- लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! ‘या’ महिलांना मिळणार 3 हजाराचा लाभ, वाचा सविस्तर