Creta N-Line चे बुकिंग सुरु ! 11 मार्चला होणार लॉन्च, इतकी असणार किंमत

Ahmednagarlive24 office
Published:
Creta N-Line

Creta N-Line : ह्युंदाई मोटर्सकडून अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला मिळणारा प्रतिसाद पाहता आता कंपनीकडून क्रेटा N-Line मॉडेल देखील लवकरच लॉन्च केले जाणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या क्रेटा N-Line मॉडेलचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. तुम्हालाही क्रेटा N-Line मॉडेल खरेदी करायचे असेल तर 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह तुम्ही डिलरशिप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर बुक करू शकता. स्पोर्टी एक्सटीरियर आणि इंटीरियर डिझायनिंगसह क्रेटा N-Line सादर केली जाणार आहे.

क्रेटा N-Line डिझाइन आणि एक्सटेरियर

क्रेटा N-Line एसयूव्ही कारचे डिझाईन अधिक स्पोर्टी बनवण्यात आले आहे. क्रेटा N-Line एसयूव्ही मध्ये एक नवीन लोखंडी जाळी आणि बंपर असेंबलीसह स्पोर्टियर फ्रंट एंड देण्यात आली आहे.

हेडलॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लॅम्पमध्ये बदल करण्यात आलेला नाही. या नवीन एसयूव्ही कारमध्ये 18 इंच अलॉय व्हील्स देण्यात येतील. तसेच स्पोर्टियर बंपर, ब्लॅक रूफसह ही कार सादर केली जाईल.

 

क्रेटा N-Line इंजिन

क्रेटा N-Line एसयूव्ही कारमध्ये 160 hp पॉवर आणि 253 Nm टॉर्क जनरेट करणारे 1.5-लिटर चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले असेल.

क्रेटा N-Line किंमत आणि स्पर्धा

क्रेटा N-Line एसयूव्ही कार Kia Seltos X Line आणि Skoda Kushaq Monte Carlo कारशी स्पर्धा करेल. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारपेक्षा नवीन क्रेटा N-Line ची किंमत 50,000 हजार रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe