Maruti Suzuki Baleno Car Discount : मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. ही भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी ऑटो कंपनी म्हणून ओळखले जाते. दरम्यान, या कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
मार्च 2024 मध्ये कंपनीने आपल्या एका लोकप्रिय कारवर हजारो रुपयांचा डिस्काउंट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना मारुती सुझुकीची लोकप्रिय कार स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी या कंपनीने मार्च 2024 मध्ये आपल्या लोकप्रिय मारुती सुझुकी बलेनो या कारवर हजारो रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे. कंपनी मारुती बलेनोच्या विविध प्रकारांवर मॉडेलनुसार सूट देत आहे.
विशेष बाब अशी की मारुती सुझुकी बलेनोच्या 2023 आणि 2024 अशा दोन्ही मॉडेलवर कंपनीकडून डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे आता ग्राहकांना बलेनो ही लोकप्रिय कार स्वस्तात खरेदी करता येणार असून कंपनीला या निर्णयामुळे मोठा फायदा होऊ शकतो अशी माहिती जाणकार लोकांनी दिली आहे.
कंपनीने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे मारुती बलेनोची विक्री वाढेल असे म्हटले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मारुती सुझुकी या कंपनीने बलेनो च्या MY2023 आणि MY2024 वर चक्क 57,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयाचा ग्राहकांना मात्र मोठा फायदा होणार आहे. कंपनी मार्च महिन्यासाठी मारुती बलेनोच्या पेट्रोल AGS ट्रिमवर 57,000 रुपयांपर्यंत कमाल सूट ऑफर करत आहे.
तसेच कंपनीकडून बलेनो सीएनजी वेरिएंटवर 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. आता आपण या कारचे फीचर्स थोडक्यात समजून घेणार आहोत.
कारचे फिचर्स कसे आहेत ?
Maruti Suzuki Baleno या कारवर कंपनीने नुकतेच डिस्काउंट देण्याचे जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत आता आपण या गाडीचे फीचर्स थोडक्यात जाणून घेणार आहोत. या कारमध्ये कंपनीने 1.2 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन दिले आहे.
जे की, 90bhp ची कमाल पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ग्राहकांना या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. विशेष बाब अशी की, हेच इंजिन बलेनोच्या सीएनजी वेरिएंटमध्ये दिले गेले आहे. मात्र त्याचे पॉवर आउटपुट 77.49bhp आणि 98.5Nm एवढे आहे.
या कारच्या इंटेरियर बाबत बोलायचं झालं तर या कारमध्ये ग्राहकांना ABS तंत्रज्ञानाव्यतिरिक्त 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल देण्यात आले आहे. सुरक्षेच्या बाबतीत देखील ही कार खूपच खास आहे. या कारमध्ये कंपनीने 6 एअरबॅग दिलेले आहेत.