Business Success Story: 5 लाखात सुरू झालेली रेडबस आज पोहचली 7000 कोटीपर्यंत! वाचा प्रेरणादायी प्रवास

Published on -

Business Success Story:- व्यवसाय म्हटला म्हणजे त्यासाठी आपल्याला गुंतवणूक करावी लागते. व्यवसायाचे स्वरूप हे गुंतवणुकीवरून ठरत असते किंवा व्यवसाय लहान करायचा आहे की मोठा यावर गुंतवणूक अवलंबून असते. आपल्याला माहित आहे की, समाजामध्ये आपण असे अनेक उदाहरणे पाहतो की अगदी छोटीशी गुंतवणुकीतून व्यवसायाला सुरुवात केलेली असते.

परंतु व्यवसाय वाढीसाठी आवश्यक प्रयत्न तसेच सातत्य व नियोजनाने ते व्यवसाय आज गगनाला पोहोचल्याचे आपण पाहतो. याच मुद्द्याला धरून जर आपण ऑनलाइन बस तिकीट कंपनी असलेल्या रेडबसची सुरुवात पाहिली तर फनींद्र सामा यांनी पाच लाख रुपये गुंतवणुकीतून रेडबसची सुरुवात केली व आज ही कंपनी 7000 कोटींच्या घरात आहे. नेमके हे फणींद्र सामा यांनी कसे शक्य करून दाखवले? याबाबतची माहिती बघणार आहोत.

 अशाप्रकारे केली रेडबसची सुरुवात

फनींद्र सामा आहे भारतीय स्टार्टअप मधील एक प्रसिद्ध नाव आहे. ते रेड बसचे संस्थापक असून सामा हे या कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी नोकरी करत असताना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले व दोन मित्रांसह पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली व रेड बसची स्थापना केली.

जर आपण रेडबस सुरू करण्यामागील कल्पना पाहिली तर त्यांना जेव्हा सणासुदीचे दिवस असताना जेव्हा घरी जाण्याकरिता बसचे तिकीट काढता न आल्याने ही कंपनी सुरू करण्याची कल्पना त्यांना आली व कंपनीची सुरुवात झाली. फनींद्र समा यांचा जन्म तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात 15 ऑगस्ट 1980 यावर्षी झाला.

त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी देखील उत्तम असून त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स मधून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व तेलंगणाचे मुख्य नवोपक्रम अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. जेव्हा ते कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांची ओळख सुधाकर पळसूपुनुरी आणि चरण पद्माराजू यांच्याशी झाली व हे तिघे मित्र झाले.

ते तिघे जण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते. नोकरी करत असतानाच फनेंद्र यांच्या डोक्यामध्ये व्यवसाय करण्याचा विचार आला व 2006 मध्ये रेड बस सुरू केली.

 अशाप्रकारे सुचली कल्पना

सदासदीच्या कालावधीमध्ये घरी जाण्याकरिता बसचे तिकीट काढण्यासाठी प्रयत्न करत असताना फनेंद्र यांना रेड बस सुरू करण्याची कल्पना सुचली व त्या क्षणी त्यांनी तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या समस्या दूर करण्याचा निश्चय केला. या कल्पनेतूनच रेड बस ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार झाला.

अल्पावधीमध्ये रेडबस लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचली व व्यवसायात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. देशातील काही मोठ्या गुंतवणूकदाराने आर्थिक पाठिंबा दिल्यामुळे रेड बस अल्पावधीमध्ये ऑनलाईन तिकीट बाजारात आघाडीवर बनली.

2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या  Naspers आणि चीनच्या Tancent यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ईबिबो ग्रुपने 828 कोटी रुपयांना विकत घेतली. नंतर काही कालावधीपर्यंत रेड बसशी फणींद्र सामा हे निगडीत राहिले आणि नंतर ते दुसऱ्या व्यवसायामध्ये गेले. सध्या ते अनेक प्रकारच्या सेवाभावी कार्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe