Salary Hike 2024:- सरकारी क्षेत्रच नाहीतर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या गुंतली असून काही कोटी लोकांचे आर्थिक जीवनाच्या कंपन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे साहजिकच अशा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली तर त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची गोष्ट असते.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण भारतातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्या पगारामध्ये कंपन्यांच्या माध्यमातून दहा टक्क्यांपर्यंत सरासरी यावर्षी वाढ होईल अशी शक्यता आहे. याबाबत एक महत्त्वाचे सर्वेक्षण कन्सल्टन्सी फर्म मर्सरने 27 फेब्रुवारीला जारी केले आहे.

कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात करू शकतात दहा टक्के वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये या वर्षी सरासरी 10% पर्यंत वाढ करू शकतात. बाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार बघितले तर ऑटोमोबाईल तसेच उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये सर्वात जास्त वाढ होईल असे अपेक्षा आहे.
कन्सल्टन्सी फर्म मर्सरने 27 फेब्रुवारी रोजी मोबदला सर्वेक्षण जारी केली व त्यानुसार 2023 ची सरासरी पगारवाढ पाहिली तर ते 9.5% होती व यावर्षी मात्र दहा टक्के वाढ होईल अशी स्थिती आहे.
काय म्हटले आहे सर्वेक्षणात?
या सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे की, भारताची अर्थव्यवस्था उत्तम काम करत असून नवनवीन कल्पना आणि प्रतिभेकरिता ती आकर्षक होताना दिसून येत आहे. उत्पादन तसेच अभियांत्रिकी आणि लाईफ सायन्स म्हणजे जीवन विज्ञान क्षेत्रातील जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारात भारतात सर्वाधिक वाढ होण्याची अपेक्षा असून एक ऑगस्ट 2023 दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले आहे
व त्यात साधारणपणे एक हजार पाचशे कंपनी आणि 6000 पेक्षा अधिक नोकरी आणि 21 लाखाहुन अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वेक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांमधील पगाराचा जो काही ट्रेंड आहे त्यावर फोकस करण्यात आलेला होता.
या सर्वेक्षणानुसार बघितले तर पगार वाढीकरिता वैयक्तिक कामगिरी, कंपनीची कामगिरी आणि वेतनश्रेणी हे घटक महत्त्वाचे असतात. त्यानुसार यावर्षी भारतातील पगारात सरासरी 10% वाढ होऊ शकते. त्यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.