Pune Traffic Update:- महाराष्ट्र मधील पुणे, मुंबई तसेच नागपूर आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या आहे ही पाचवीलाच पुजलेली आहे. वाहतूक कोंडीमुळे मिनिटाचा प्रवास करण्याला तासाभराचा देखील वेळ लागू शकतो व त्यामुळे खूप मोठ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
ही समस्या तर पुणे तसेच मुंबईसारख्या शहरांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर उद्भवते. यामध्ये जर आपण पुणे शहराचा विचार केला तर पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये ट्रॅफिकची समस्या प्रत्येक दिवसाला वाढत असून याचा खूप मोठा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.
यावर सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपाय योजना देखील अवलंबल्या जातात. परंतु तरी देखील कुठलाही फायदा होताना दिसून येत नाही.
या पार्श्वभूमीवर आता पुणेकरांसाठी महत्वाची बातमी असून नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता आता पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असून 5 मार्च म्हणजेच उद्यापासून पुणे शहरामध्ये अवजड वाहनांना आता प्रवेश नसणार आहे.
पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल
पुणे शहरामध्ये सोलापूर किंवा सातारा तसेच मुंबई इत्यादी शहरांमधून मोठ्या प्रमाणावर जड वाहने येत असतात व यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते.
या कायमच्या समस्येवर तोडगा निघावा याकरिता पुणे वाहतूक पोलिसांनी उद्यापासून जड वाहनांना बंदी घातली असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
जर आपण पाहिले पुणे शहरातील पुणे ते सोलापूर, पुणे ते अहमदनगर, पिंपरी चिंचवड व पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्ण बंदी असणार आहे.
वाहनधारकांनो या पर्यायी मार्गांचा करा वापर
1- अवजड वाहनांना वाघोली ते पुणे शहराच्या दिशेने 24 तास प्रवेश करता येणार नाही. या ऐवजी जडवाहनधारकांनी शिक्रापूर हुन चाकण मार्गे पिंपरी चिंचवड तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे तसेच अहमदनगरकडे जड वाहनांना जाता येणार आहे.
2- सोलापूरला जायचे असेल तर थेऊर फाटा येथून पुढे लोणीकंद आणि शिक्रापूर वरून पर्यायी मार्ग आहे.
3- पुणे ते सासवड जड वाहनांसाठी हडपसर मार्गे थेऊर फाटा येथून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच या ठिकाणाहून लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गाने देखील जड वाहनांना प्रवास करता येणार आहे.