Hyundai लवकरच लाँच करणार ‘ही’ नवीन SUV ! लॉन्चिंगआधीच 75 हजार लोकांनी केली बुकिंग, वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:
Hyundai New Car

Hyundai New Car : Hyundai ही एक आघाडीची कार निर्माता कंपनी आहे. ही कंपनी भारतात सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या कंपनीच्या यादित दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. मारुती सुझुकी नंतर ह्युंदाई कंपनीच्या सर्वाधिक कार आपल्या देशात विकल्या जात आहेत.

दरम्यान ही कंपनी लवकरच आपल्या ग्राहकांसाठी Creta N Line ही नवीन कार लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन कार 11 मार्च रोजी भारतात अधिकृतरित्या लॉन्च होणार आहे.

दरम्यान N-Line बॅज असणारी ही कंपनीची तिसरी कार राहणार आहे. याआधी कंपनीने i20 N Line आणि Venue N Line या कार भारतीय बाजारात उतरवल्या आहेत.

या दोन्ही गाड्यांना मिळणारी लोकप्रियता पाहता आता कंपनीने या प्रकारातील ही तिसरी गाडी लॉन्च करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. या नव्याने बाजारात लॉन्च होणाऱ्या गाडीसाठी कंपनीने अवघे पंचवीस हजार रुपये एवढे टोकन अमाऊंट घेऊन बुकिंग देखील सुरू केली आहे.

विशेष म्हणजे लॉन्चिंग आधीच या गाडीची लोकप्रियता पाहायला मिळत आहे. कारण की या गाडीचे 75000 हून अधिक युनिटचे बुकिंग झाले आहे. Hyundai Creta N-Line कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन बुकिंगसाठी उपलब्ध आहे.

इच्छुक ग्राहक 25,000 रुपयांमध्ये एसयूव्ही बुक करू शकतात. देशभरातील ऑटोमेकरच्या डीलरशिपवर SUV ऑनलाइन बुकिंगसाठीही उपलब्ध आहे. Hyundai ने म्हटले आहे की Creta N-Line साठी प्रतीक्षा कालावधी 6 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान आहे. SUV N8 आणि N10 या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

कसे राहणार डिझाईन 

Hyundai ने SUV च्या स्टँडर्ड व्हेरियंटच्या तुलनेत Creta N-Line चे बाह्य भाग मोठ्या प्रमाणात बदलले आहेत. या गाडीचे डिझाईन आधीच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात चेंज झाले आहेत. ही नव्याने लॉन्च होणारी गाडी नवीन डिझाइन केलेल्या 18-इंच अलॉय व्हील्सवर चालते.

इतर डिझाइन घटकांमध्ये स्पोर्टी ट्विन-टिप एक्झॉस्ट थूथन, एन लाइन लोगो, साइड सिल्सवर लाल इन्सर्ट, समोर आणि मागील रेड ब्रेक कॅलिपर आणि मागील रेड इन्सर्टसह स्पोर्टी स्किड प्लेट यांचा समावेश राहणार आहे. ही गाडी ॲटलस व्हाइट, ॲबिस ब्लॅक आणि टायटन ग्रे मॅट या कलर ऑप्शन मध्ये बाजारात विक्रीसाठी दाखल होईल.

कसे राहणार इंटेरियर 

Hyundai Creta N-Line देखील केबिनमध्ये लक्षणीयरित्या अपडेट केली जाईल. एसयूव्ही केबिनमध्ये स्पोर्टी ऑल-ब्लॅक थीमसह येईल. हे ड्युअल-डिस्प्ले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येईल.

यात ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री सराउंड-व्ह्यू कॅमेरा, वायरलेस चार्जर, ॲम्बियंट लाइटिंग यांसारखें फीचर्स देखील राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe