ईपीएफओ देत आहे 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण! EPF मध्ये योगदान देत असाल तर तुम्हाला देखील होईल फायदा

Published on -

मोठ्या प्रमाणावर कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असून कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्याचे नियमन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून केले जाते. कर्मचाऱ्यांचा जो काही महिन्याचा पगार असतो त्यामध्ये दर महिन्याला ईपीएफ खात्यापोटी काही रक्कम कापली जाते व हीच रक्कम कर्मचारी पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडच्या रूपामध्ये वापरतात.

याचा अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून  जे कर्मचारी ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देतात त्यांच्या करिता मोफत विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेचे नाव आहे कर्मचारी ठेव लींक्ड विमा योजना हे होय. या योजनेच्या माध्यमातून  जर ईपीएफमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याचा अचानक  मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला सात लाख रुपये पर्यंतची विमा संरक्षण किंवा विमा रक्कम मिळते.

 ईपीएफओ देते सात लाख रुपयांचे विमा संरक्षण

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना खास कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली असून ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या विमा योजनेच्या माध्यमातून मोफत विमा संरक्षण मिळत असून कर्मचाऱ्यांचा जर अचानक मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला सात लाख रुपये पर्यंतचे विमा संरक्षण किंवा विमा रक्कम मिळणार आहे.

ही विमा योजना कर्मचाऱ्यांकरिता एक मोफत विमा योजना म्हणून काम करणार असून यामध्ये जे नॉमिनेटेड लाभार्थी आहे त्यांना सात लाख रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्याचा दावा करता येणार आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्याला कोणी वारस नसेल तर त्या कर्मचाऱ्यांच्या जे काही कायदेशीर वारस असतील त्यांच्यामध्ये हे पैसे समान प्रमाणात वितरीत करण्यात येतात.

ईपीएफओच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू आणि आजारपणाच्या मृत्यू प्रकरणांमध्ये कव्हरेज दिले जाते.

 कसे आहे कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजनेचे स्वरूप?

या योजनेच्या माध्यमातून जे काही लाभाची रक्कम असते ती कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या पगाराच्या आधारावर ठरवली जाते. जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर नॉमिनेटेड व्यक्ती 20% बोनस सह मागील बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या ती 30 पट लाभ मिळण्यास पात्र ठरतो.

यामध्ये जर आपण कर्मचाऱ्याचे महिन्याची पीएफ कपात पाहिली तर त्यामध्ये 8.3% कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएस, 3.67% ईपीएफ आणि 0.5% ठेव लिंक्ड विमा योजने करिता वाटप केले जाते.

 काय आहे प्रमुख अट?

खातेदाराच्या विमा संरक्षणातून लाभार्थी कमीत कमी अडीच लाख रुपये व जास्तीत जास्त सात लाख रुपयांचा दावा या माध्यमातून करू शकतात व या योजनेकरिता लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी कमीत कमी बारा महिने सतत नोकरी करत असणे गरजेचे आहे.

असे नसेल तर या योजनेचा लाभ किंवा विम्याचा फायदा मिळत नाही. एक महत्त्वाची योजना असून कर्मचारी व त्यांचे कुटुंब यांच्याकरिता एक महत्त्वाची आर्थिक सुरक्षा म्हणून ही योजना काम करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe