तुम्ही न्या कार, नंतर द्या पैसे; ‘या’ मोठ्या ब्रॅण्डची ऑफर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लोकडाऊन जाहीर झाले. यामुळे आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. याचा फटका अनेक उद्योग , व्यावसायिकांना बसला. तसाच दणका ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बसला आहे.

कारच्या विक्रीत तेजी यावी म्हणून देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना एक नवीन ऑफर दिली आहे. ‘बाय नाऊ, पे लेटर’ (आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या) अशी ही ऑफर आहे.

यामध्ये कंपनीने 90 टक्के ऑन-रोड फंडिंग आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासह इतर पर्याय देखील दिले आहेत. बाय नाऊ पे लेटर योजने अंतर्गत, मारुती कार खरेदी करणाऱ्या ग्राहकाला ईएमआय सुरू करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी मिळेल.

याचा अर्थ जर आपण आता मारुतीची कार खरेदी केली, तर याचे ईएमआय कार कर्ज घेतल्याच्या 2 महिन्यांनंतर सुरू होईल. ही ऑफर मारुतीच्या निवडक कारवर उपलब्ध आहे. 30 जून 2020 रोजी किंवा त्यापूर्वी घेतलेल्या कर्जावर ही ऑफर लागू होईल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment