LIC Scheme:- भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वसनीय विमा कंपनी आहे. या माध्यमातून विमाच नाही तर भविष्याच्या सुरक्षेच्या बाबतीत देखील आश्वासित केले जाते. एलआयसीच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या वर्गातील लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली असून तिचे नाव आहे ‘एलआयसी भाग्य लक्ष्मी योजना’ हे होय.
हा एक मायक्रो टर्म इन्शुरन्स प्लान असून कमी उत्पन्न गटातील लोकांना समोर ठेवून हा प्लान बनवण्यात आलेला आहे. अगदी कमीत कमी प्रीमियममध्ये तुम्हाला जीवन विमा सुरक्षा या माध्यमातून दिली जाते. या लेखात आपण एलआयसीच्या भाग्यलक्ष्मी प्लान बद्दल माहिती घेणार आहोत.

कसे आहे एलआयसीच्या भाग्यलक्ष्मी प्लानचे स्वरूप?
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीची भाग्यलक्ष्मी योजना ही खूप लोकप्रिय अशी योजना असून कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी ही फायद्याची योजना आहे. एलआयसीच्या या विमा पॉलिसीमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना अतिशय कमी आणि मर्यादित कालावधीत कमीत कमी पैशांमध्ये चांगला परतावा मिळणे शक्य आहे.
देखील एलआयसीच्या भाग्यलक्ष्मी योजनेत पॉलिसी घ्यायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला तुमचे मेडिकल चाचणी द्यावी लागते व या चाचणी शिवाय विमा पॉलिसी घेता येत नाही. एलआयसीच्या भाग्यलक्ष्मी पॉलिसीच्या माध्यमातून 110 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो व महत्त्वाचे म्हणजे एलआयसीची ही योजना परिपक्व झाल्यानंतर म्हणजेच मॅच्युरिटी नंतर तुम्हाला रिटर्न मिळतो.
एलआयसीच्या भाग्यलक्ष्मी विमा पॉलिसी घेण्यासाठीची पात्रता
जर आपण एलआयसीच्या भाग्यलक्ष्मी पॉलिसीचा विचार केला तर कमीत कमी 19 वर्षे आणि जास्तीत जास्त 55 वर्ष वय असलेले व्यक्ती यामध्ये पॉलिसी घेऊ शकतात. ही पॉलिसी तुम्हाला किमान पाच ते कमाल 13 वर्षांकरिता घेता येते. या भाग्यलक्ष्मी पॉलिसीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुमचे जे काही प्रीमियम पेमेंट असते त्यापेक्षा तुम्हाला दोन वर्ष अधिक कालावधी करिता कव्हर मिळत असतो.
या योजनेत किती मिळते विमा रक्कम?
एलआयसीच्या या पॉलिसीवर कमीत कमी वीस हजार रुपयांची विमा रक्कम मिळते व त्यावेळी जास्तीत जास्त 50 हजार रुपयांची विमा रक्कम देखील मिळतो. म्हणजे साधारणपणे 110 टक्क्यांचा रिटर्न या माध्यमातून मिळतो. या योजनेच्या बाबतीत एक महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे
जर एखाद्या विमाधारकाने एक वर्षाच्या आत मध्ये आत्महत्या किंवा इतर कारणाने मृत्यू झाला तर विम्याचा लाभ मिळणार नाही. एक वर्षानंतर काही घटना घडल्यास विमाधारकाच्या वारसाला संपूर्ण रक्कम मिळते. तसेच या एलआयसीच्या प्लान मध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर्ज सुविधा उपलब्ध होत नाही.
एलआयसीचा भाग्यलक्ष्मी प्लॅन आहे टर्म प्लान
एलआयसी ची भाग्यलक्ष्मी पॉलिसी प्लान हा एक टर्म प्लान असून पॉलिसी सुरू असताना जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तरच तुम्हाला लाभ मिळतो. परिपक्वतेवर कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही. तसेच या पॉलिसी कालावधीमध्ये तुम्ही पॉलिसी सरेंडर करू शकतात.
परंतु यामध्ये तुम्ही जमा केलेली जी काही प्रीमियमची रक्कम आहे त्यापेक्षा कमी सरेंडर व्हॅल्यू तुम्हाला मिळते. या योजनेमध्ये तुम्ही वार्षिक, सहामाही किंवा त्रैमासिक किंवा मासिक या आधारावर पेमेंट करू शकता.
तसेच या योजनेत कुठल्याही प्रकारचा जीएसटी वगैरे लागू नसल्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या लोकांची प्रीमियमची रक्कम आणखीन कमी होते. त्यामध्ये कमीत कमी इन्स्टॉलमेंट प्रीमियम हा पाचशे रुपये पासून सुरू होतो.